Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा पुतळा कोसळला; मनोज जरांगे म्हणाले, फडवणीस शिवरायांचे दुश्मन…

Manoj Jarange on Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळला. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शिवरायांचा पुतळा कोसळला; मनोज जरांगे म्हणाले, फडवणीस शिवरायांचे दुश्मन...
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 12:37 PM

महाराष्ट्रासह देशाचं प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा पराक्रम… त्यांचं कार्य… शिवरायांनी 17 व्या शतकात त्यांनी बांधलेले किल्ले आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. पण केवळ 8 महिन्यांआधी उद्घाटन झालेला मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला अन् त्याच सोबत लाखो शिवभक्तांच्या मनात चर्र झालं. शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रभरात या घटनेचा निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

फडणवीसांबाबत काय म्हणाले?

शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभरात संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. मनोज जरांगेंनी यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत दुदैवी बाब आहे. याचे दूरगामी परिणाम वाईट परिणाम सरकारवर होऊ शकतात. परंतु देवेंद्र फडवणीस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं दुश्मन म्हटलं जात आहे. यात आम्हाला राजकारण करायचं नाही. देवेंद्र फडवणीस हे शिवरायांचे दुष्मन आहेत, असे आम्ही म्हणणार नाही. पण फडणवीस यांनी चौकशी करून तो पुतळा बनवणाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाही तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असं मनोज जरांगे म्हणालेत.

पुतळा तयार करणाऱ्यांला जबर शिक्षा द्या- जरांगे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. स्मारक पडले हा महाराजांचा मोठा अवमान आहे. ज्यांची या सगळ्यात चूक आहे, त्यांच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे की त्याला कधीच जेलमधून सोडू नये. पुतळ्याचं काम करणाऱ्याला जरब बसली पाहिजे, असं जरांगेंनी म्हटलंय.

केसरकरांवर निशाणा

शिवरायांचा पुतळा पडणं हा अपघात आहे. त्याचप्रमाणे त्याला घ्यावं. कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं काहीतरी घडायचं असेल. त्याच्यासाठी सुद्धा हा अपघात घडला असेल. काहीही सांगता येत नाही. अपघात कसा घडला? याची चौकशी सरकार करेन. पण कारवाईने जखमा भरून येत नाहीत. त्यासाठी इथे भव्य पुतळा तयार करावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. त्यांचं हे विधान चर्चेत आहे. यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.

दीपक केसरकर यांना आम्ही हुशार मानत होतो. शिवरायांचा पुतळा पडला आहे, अवमान झाला आहे. सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत आणि ते याला शुभ संकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं… एका मंत्र्यांने छत्रपती शिवरायांबद्दल असं बोलणं म्हणजे अवघड आहे… त्यांचा म्हणण्याचा उद्देश दुसरा असू शकतो. त्यांचा अंदाज आणि रोख असा असू शकतो की भाजपचे सरकार जाते की काय…?, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.