राजेंविरुद्ध लढले, आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार, उदयनराजे आणि संभाजीराजे एकाच मंचावर?

उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र येणार

राजेंविरुद्ध लढले, आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार, उदयनराजे आणि संभाजीराजे एकाच मंचावर?
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 12:05 PM

मुंबईः सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकलं आहे. कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत.(maratha kranti morcha Udayan Raje and Sambhaji Raje on coming the same stage?)

उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

नरेंद्र पाटील म्हणतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आमच्या बऱ्याच संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. एक बैठक आमची छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये झाली. कोल्हापूरमध्येही आमच्या भाऊबंधांनी बैठक घेतली. पुण्यात आमदार विनायक मेटेंनी बैठक घेतली. त्या बैठकीला छत्रपती उदयनराजे जाणार असं समजलं. 1980ला माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी मागणी केली होती. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विदर्भातील शेतकरी आरक्षणापासून वंचित राहत होता. पण आता तसं होऊ देणार नसल्याचंही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

आमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल. जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही. एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे.

उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

(Maratha Kranti Morcha| मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड)

maratha kranti morcha Udayan Raje and Sambhaji Raje on coming the same stage?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.