विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन मराठा मोर्चा आक्रमक

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. त्यावरुन मराठा मोर्चा चांगलाच आक्रमक झाला आहे. विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा,  नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन मराठा मोर्चा आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 9:51 AM

नाशिक: मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. (Maratha Morcha on Help and rehabilitaion minister Vijay Wadettiwar)

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको’, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत. टीव्ही 9 कडे दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन

मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणाने लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असं दरेकर यांनी म्हटल आहे.

संबंधित बातम्या:

OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेला भाजपचं समर्थन, ‘त्या’ जागा बाजूला ठेवून नोकरभरतीची मागणी

Maratha Morcha on Help and rehabilitaion minister Vijay Wadettiwar

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.