Maratha Reservation : मराठा समाजाला आणखी एक धक्का, EWS आरक्षणही रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ई डब्ल्यू एस आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात पुन्हा आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्याचं मोठं आव्हान हे नव्या शिंदे-फडणवीस सरकारसमोर असणार आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला आणखी एक धक्का, EWS आरक्षणही रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मराठा समाजाला आणखी एक धक्का, EWS आरक्षणही रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:40 PM

मुंबई : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातलं राजकारण आधीच तापलं असताना आता हायकोर्टाने (Bombay High Court) मराठा समाजाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. कारण मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेले ईडब्लूएस आरक्षण (EWS Reservation) ही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण फेल ठरल्यानंतर राज्य शासनाकडून मराठा समाजाला देण्यात दिलासा देण्यासाठी ई डब्लू एस आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र त्यालाही आता मोठा ब्रेक लागला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अडचणीतही आता मोठी वाढ झाली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजात पुन्हा आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्याचं मोठं आव्हान हे नव्या शिंदे-फडणवीस सरकारसमोर असणार आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचा आजचा निकाल अनपेक्षित असून, राज्य सरकारने त्यास तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी आमची मागणी आहे. निकालपत्र उपलब्ध झाल्यानंतर विस्तृतपणे बोलता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांचं ट्विट

आरक्षणाचा संघर्ष कधी संपणार?

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचं घोंगडे हे भिजत पडलेलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं मात्र त्याची टक्केवारी काहीशी कमी झाली. सुरुवातीला 16% दिलेलं आरक्षण हे हायकोर्टात पोहचल्यावर 13 टक्क्यांवरती आलं. मात्र सुप्रीम कोर्टात जाताच मराठा आरक्षण टिकू शकलं. नाही आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण थेट रद्दच करून टाकलं. त्यामुळे मराठा  समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष अजूनही संपायचं नाव घेत नाहीये. गेल्या काही वर्षात आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली आहेत. तसेच सतत कोर्टातला लढाई सुरूच आहे. मात्र तरीही अद्याप आरक्षणाच्या आशा या धूसर दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळातला संघर्ष हा कायम आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.