Maratha Reservation | अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचं, त्यांना या गोष्टी माहिती नाही?; खासदार संभाजीराजे संतापले
संभाजीराजेंनी 'टीव्ही-9 मराठी'ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या बेफिकीरीवर संताप व्यक्त केला.
मुंबई : “अशोक चव्हाणांना फोन करुन काय करायचंय, त्यांना काय या गोष्टी माहिती नाही का? (MP Sambhajiraje Chhatrapati Criticize Ashok Chavan), मी आणखी नवीन काय सांगणार”, असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा आक्रोश व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी होती. मात्र, यावेळी राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायमूर्तींनी सुनावणी काही काळासाठी तहकूब केली. यावर संभाजीराजेंनी ‘टीव्ही-9 मराठी’ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या बेफिकीरीवर संताप व्यक्त केला (MP Sambhajiraje Chhatrapati Criticize Ashok Chavan).
“मी अशोक चव्हाणांना परवाही फोन केला. त्यांना समितीची बैठक घ्यायला सांगितली. आता त्यांना वारंवार फोन तरी का करायचा? या गोष्टी त्यांना समजत नाही का?, सगळं समजतं, मी आणखी नवीन काय सांगणार”, असा उद्विग्न सवाल संभाजीराजेंनी केला.
खासदार संभाजीराजे काय म्हणाले?
“मला आश्चर्य वाटतेय. मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय की फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा. उपसमितीची बैठक घेण्याबाबत त्यांना दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. पण ती मिटिंगही झालेली दिसत नाहीये”, असं संभाजीराजे म्हणाले.
अशोकराव जिथे कुठे असतील तिथून कृपया कोऑर्डिनेट करा : संभाजीराजे
“हे दुर्दैव आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आपल्याला विचारतात की कुठे आहेत सरकारी वकील, तेव्हा ते तिथे हजर नसतात. आपले सरकारी वकील तिथे उपस्थित नसणे हे दुर्दैवं आहे, गंभीर आहे. त्यामुळे अशोकराव जिथे कुठे असतील तिथून कृपया कोऑर्डिनेट करा”, अशी सूचना संभाजीराजेंनी केली (MP Sambhajiraje Chhatrapati Criticize Ashok Chavan).
मराठा समाजाला गृहित का धरताय?, संभाजीराजेंचा सरकारला सवाल
“मराठा समाजाला तुम्ही अशा पद्धतीने गृहित का धरायला लागले आहात, का त्यांच्याशी खेळखंडोबा करायला लागले आहात. हे बरोबर नाही. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की सर्वोच्च न्यायालयात समाजाचं आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी जी केस सुरु आहे तिथे वकिलांना पोहोचवावं. आमचा वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण आपली बाजू तिथे मांडणं महत्त्वाचं आहे”, असंही ते म्हणाले.
“मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. काही तरी तांत्रिक घोळ झाला आहे, असे माझ्या कानावर आले आहे. पण त्यातही आपल्याकडे वेळ आहे. आपण दुरस्ती करु शकतो. जर पुढच्या सुनावणीत कोणी हजर राहिलं नाही तर हा मॅसेज चुकीचा जाईल. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा”, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
मी आता थकलोय – संभाजीराजे
“मी कित्येक वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, मुंबई नवी मुंबईत या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने काही तरी पावलं उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे. मी थकलोय”, असा उद्वेग संभाजीराजेंनी व्यक्त केला.
मी कित्येक वेळा माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरतो, मी थकलोय : खासदार संभाजीराजेhttps://t.co/WZaKNhBSjw #MarathaReservation #Maratha #Sambhajiraje @YuvrajSambhaji @AshokChavanINC
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 27, 2020
MP Sambhajiraje Chhatrapati Criticize Ashok Chavan
संबंधित बातम्या :
घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला पत्रच दिलं नाही; विनायक मेटेंचा आरोप
पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच मराठा आरक्षणाची सुनावणी करा; याचिकाकर्ते ठाम
सरकारवर विश्वास नसेल तर मराठा संघटनांनी त्यांचा वकील लावावा : अशोक चव्हाण