राजकारणात येणार?; मनोज जरांगे पाटील यांचा होकार की नकार?

24 डिसेंबर जवळ येत असल्याने शिंदे समितीने काम करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि सरसकट पाहिजे. अभ्यासकांचे संख्या बळ कमी असल्याने नोंदी खूप कमी सापडल्या आहेत. काही जिल्हाधिकारी नोंदणी संदर्भात काम करत नाहीत. संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाहिजे तसं काम करत नाहीत. संभाजीनगरच्या कलेक्टरने तर कक्ष बंद केला आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

राजकारणात येणार?; मनोज जरांगे पाटील यांचा होकार की नकार?
manoj jarange patilImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 4:01 PM

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 6 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हे गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात फिरून सभा घेत जनजागृती करत आहेत. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी नसते, एवढी प्रचंड गर्दी जरांगे पाटील यांच्या सभांना असते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येण्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना त्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट सांगून टाकलं.

सगळ्या समाजाचं नेतृत्व करणार का? असं मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, मी मुलगा म्हणून काम करतोय. नेता बनण्याची हवाच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? ते (छगन भुजबळ) आम्हाला आरक्षण मिळू देत नाही, असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी त्यांना? नुसतं विरोध करायचा म्हणून करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांना कशाला मेसेज द्यायचा?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काही मेसेज देणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना काय मेसेज द्यायचा? त्यांना दाखवण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. ओबीसी बांधव स्वतः हून आलेत. ते आम्हाला साथ देतील मग आम्ही का देऊ नये.. बैठक झाली, त्यांचा फॉर्म्युला काय आहे हे कळलं की ठरेल सगळं, असं जरांगे म्हणाले.

भुजबळांनी आरक्षण खाल्ले

बारा बलुतेदार समाजाने आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. छगन भुजबळ हे विनाकारण वातावरण दूषित करत आहेत. ते आम्हाला खाऊ देत नाही अशी बारा बलुतेदार समाजाची मागणी आहे. छोट्या छोट्या जातींना ओबीसी आरक्षणाचा काही फायदा झाला नाही आणि होऊ दिला जात नाही. बारा बलुतेदारांतून गेल्या तीस वर्षात एकही एमबीबीएस झाला नाही, असं बारा बलुतेदारांच्या अध्यक्षाने सांगितलं. छगन भुजबळ यांनी सामाजिक तर नाहीच, परंतु शैक्षणिक आरक्षण ही मिळू दिले नाही. तुम्ही (भुजबळ) खूप खाल्ले, जेलमध्ये जाऊन आलात आणि आरक्षण कसे देत नाही ते आम्ही बघू, असा इशाराच त्यांनी दिला.

त्यांचे बिस्किट खा आणि…

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांनी आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन केलं आहे. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या या भूमिकेवरही मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी चहापान करताना चर्चा करून मराठा समाजाला पटकन आरक्षण द्यावे. कधीपर्यंत चहापानावर बहिष्कार टाकणार आहात. बहिष्कार टाकल्याने आरक्षण मिळत नाही. तुम्ही आरक्षणावर चर्चा करा. त्यांचे बिस्किट खा. चहाचे पैसे तुम्ही द्या. पण मराठा समाजाचा प्रश्न निकाली काढा. उद्या चर्चा करण्यापेक्षा आजच चर्चा करा. तुम्ही सर्वकाही सोपं समजू नका. चहापाणी हे नाटक करू नका. 24 तारखेला कसे असते ते कळेल, असा इशाराच त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हे गावोगावी फिरत आहेत. जिल्ह्यात फिरून सभा घेत जनजागृती करत आहेत. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेलाही एवढी गर्दी नसते, एवढी प्रचंड गर्दी जरांगे पाटील यांच्या सभांना असते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे राजकारणात येण्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना त्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट सांगून टाकलं.

सगळ्या समाजाचं नेतृत्व करणार का? असं मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, मी मुलगा म्हणून काम करतोय. नेता बनण्याची हवाच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? ते (छगन भुजबळ) आम्हाला आरक्षण मिळू देत नाही, असं ओबीसींचं म्हणणं आहे. त्यामुळे धनगर बांधवांनी का साथ द्यावी त्यांना? नुसतं विरोध करायचा म्हणून करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांना कशाला मेसेज द्यायचा?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना काही मेसेज देणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना काय मेसेज द्यायचा? त्यांना दाखवण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. ओबीसी बांधव स्वतः हून आलेत. ते आम्हाला साथ देतील मग आम्ही का देऊ नये.. बैठक झाली, त्यांचा फॉर्म्युला काय आहे हे कळलं की ठरेल सगळं, असं जरांगे म्हणाले.

भुजबळांनी आरक्षण खाल्ले

बारा बलुतेदार समाजाने आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. छगन भुजबळ हे विनाकारण वातावरण दूषित करत आहेत. ते आम्हाला खाऊ देत नाही अशी बारा बलुतेदार समाजाची मागणी आहे. छोट्या छोट्या जातींना ओबीसी आरक्षणाचा काही फायदा झाला नाही आणि होऊ दिला जात नाही. बारा बलुतेदारांतून गेल्या तीस वर्षात एकही एमबीबीएस झाला नाही, असं बारा बलुतेदारांच्या अध्यक्षाने सांगितलं. छगन भुजबळ यांनी सामाजिक तर नाहीच, परंतु शैक्षणिक आरक्षण ही मिळू दिले नाही. तुम्ही (भुजबळ) खूप खाल्ले, जेलमध्ये जाऊन आलात आणि आरक्षण कसे देत नाही ते आम्ही बघू, असा इशाराच त्यांनी दिला.

त्यांचे बिस्किट खा आणि…

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांनी आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन केलं आहे. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या या भूमिकेवरही मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी चहापान करताना चर्चा करून मराठा समाजाला पटकन आरक्षण द्यावे. कधीपर्यंत चहापानावर बहिष्कार टाकणार आहात. बहिष्कार टाकल्याने आरक्षण मिळत नाही. तुम्ही आरक्षणावर चर्चा करा. त्यांचे बिस्किट खा. चहाचे पैसे तुम्ही द्या. पण मराठा समाजाचा प्रश्न निकाली काढा. उद्या चर्चा करण्यापेक्षा आजच चर्चा करा. तुम्ही सर्वकाही सोपं समजू नका. चहापाणी हे नाटक करू नका. 24 तारखेला कसे असते ते कळेल, असा इशाराच त्यांनी दिला.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.