विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा आरोप; आता वडेट्टीवारांचं जोरदार प्रत्युत्तर
विनायक मेटे यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. मार्गासवर्ग मंडळं त्या-त्या समाजासाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करत असतात. विनायक मेटे यांनी वेगळा चष्मा लावला आहे. ज्याला कोणताही आधार नाही असं ते बरळत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मेटेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मेटेंच्या या टीकेला आता विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विनायक मेटे यांना वाटेल ते बरळण्याचा अधिकार आहे. जातीयवादी कोण आहे हे राज्यातील जनतेला मेटेंच्या मागील दोन-तीन वर्षाच्या वक्तव्याकतून दिसून येतं असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय. (Vijay Vadettiwar’s reply to Shiv Sangram leader Vinayak Mete’s allegation)
विनायक मेटे यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. मार्गासवर्ग मंडळं त्या-त्या समाजासाठी, भटक्या विमुक्तांसाठी काम करत असतात. विनायक मेटे यांनी वेगळा चष्मा लावला आहे. ज्याला कोणताही आधार नाही असं ते बरळत असतात. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी मेटेंना प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, विनायक मेटे यांनी वडेट्टीवार हे जातीयवादी माणूस असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
विनायक मेटेंचा नेमका आरोप काय?
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केलीय.
मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी आम्ही आज धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा दिलाय. जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर 23 तारखेपासून अहमदनगरपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा इशाराही मेटेंनी राज्य सरकारला दिलाय. शिवस्मरकाचे काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय, असा खोचक टोला मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लगावलाय. शिवस्मारकाचं कामही लवकरात लवकर सुरू व्हायला हवं, अशी मागणी मेटे यांनी केलीय.
‘छत्रपतींच्या स्मारकासाठी 2 वर्षात 2 मिनिटेही वेळ दिला नाही’
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी जळगावात केला होता.
इतर बातम्या :
गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट! श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना यंदाही मुख्य मंदिरातच
Vijay Vadettiwar’s reply to Shiv Sangram leader Vinayak Mete’s allegation