अखेर मनोज जरांगेंचा पत्ता ओपन, मंत्रिमंडळ विस्तार होताच अंतरवालीमधून केली मोठी घोषणा

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मनोज जरांगे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

अखेर मनोज जरांगेंचा पत्ता ओपन, मंत्रिमंडळ विस्तार होताच अंतरवालीमधून केली मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 4:36 PM

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत.  तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मागणीला विरोध होत आहे.

दरम्यान मंत्रिमंड विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की,  ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही.  आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकार या आधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

दरम्यान काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांना डावलण्यात आलं, यावर देखील जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.   छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याच आम्हाला देणं घेणं नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.