ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये (Audio Clip Viral) मराठा आरक्षण आणि चंद्रकात पाटील यांचा उल्लेख आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर काहींनी आरोप केला आहे.
मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं आरोप या क्लिपचा हवाला देत करण्यात आला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. दरम्यान, खुद्द चंद्रकांत पाटील यांनादेखील कथित ऑडिओ क्लिपबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत.
व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन अज्ञात व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत आहेत. या व्यक्तींमधील संवादाची पार्श्वभूमी मराठा आरक्षण होती, असं सांगितलं जातंय. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकातदादा पाटील यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच परळीतील आंदोलनाचाही नामोल्लेख या संभाषण ऐकू आलाय.
कथिक ऑडिओ क्लिपमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरुनही चर्चा झालीय. नेमक्या कोणत्या व्यवहाराबाबात या दोन अज्ञात व्यक्तींमध्ये संवाद सुरु होता, याचे संदर्भ नेमकेपणे स्पष्ट होऊ शकले नाही. या कथित ऑडिओ क्लिपमुळे तर्क वितर्कांना उधाण आलंय.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी कथिक ऑडिओ क्लिपचा हवाला देत करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. फोडाफोडीचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी म्हटलं. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच लावून धरला होता, असंही ते ठामपणे म्हणाले.
व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपची वैध आहे की नाही, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे अशा कथित ओडिओ क्लिपवर विश्वास ठेवण्याचं कारण नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
नेमक्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ज्यांच्यात संवाद सुरु आहेत, ते दोघे कोण? त्यांच्यातील व्यवहाराचा संदर्भ नेमका कोणता? आता ही क्लिप व्हायरल झाली असली, तरी नेमका का संवाद कधीचा आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित झालेत.