अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी

सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणची केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केलीय.

अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान; महाराष्ट्राला 7 हजार कोटी मदत द्या, विजय वडेट्टीवारांची मागणी
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 2:25 PM

मुंबई : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक भागात शेती पाण्याखाली गेलीय. तर सोयाबीनसह ऊस पिकांचं भरुन न येणारं नुकसान झालंय. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केलीय. (Huge loss to farmers due to heavy rains in Marathwada)

विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचं वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं.

‘महाराष्ट्राला 7 हजार कोटी रुपये द्या’

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान 7 हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तसंच आज मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार अशल्याची माहिती त्यांनी दिलीय.

आशिष जयस्वाल यांना टोला

दरम्यान, शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्या वक्तव्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे विधान हे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी केलेली धडपड म्हणावी लागेल. मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचं हे विधान पोहोचलं असेल आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांचं हे विधान किती योग्य आहे हे त्यांनीच ठरवावं, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय.

आशिष जैस्वाल नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस नेते मेले होते उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतल्यानंतर ते जिवंत झाले होते. यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती. तुम्ही लोकं मेलेला होता, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, सर्वजण सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात यायला तयार होते. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं त्यामुळं मेलेले लोकं जिवंत झाले आहेत. शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एकाला मी पुरुन उरणार आहे, असा इशारा आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

इतर बातम्या :

Kirit Somaiya vs Hasan Mushrif : आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात, अंबाबाईच्या दरबारात सोमय्यांचा एल्गार

नाशिकची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी 12 पासून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू

Huge loss to farmers due to heavy rains in Marathwada

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.