ओवेसी बंधूंना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमान्य, जलील यांचंही पावलावर पाऊल?

या कार्यक्रमाला मराठवाड्यातील (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) सर्वच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहत असतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे सर्वत्र इम्तियाज जलील यांच्यावर टीका होत आहे.

ओवेसी बंधूंना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमान्य, जलील यांचंही पावलावर पाऊल?
Follow us
| Updated on: Sep 17, 2019 | 6:31 PM

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा मराठवाड्यातील (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) जनतेसाठी एक महत्वाचा उत्सव आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठवाडा (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाल्यामुळे एकप्रकारे या दिवशी स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाला मराठवाड्यातील (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) सर्वच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहत असतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे सर्वत्र इम्तियाज जलील यांच्यावर टीका होत आहे.

औरंगाबाद शहरातल्या मुक्तीसंग्राम स्तंभापाशी आज भल्या सकाळी सुरू लगभग सुरु होती. जुलमी निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) झाला त्याचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पण या कार्यक्रमाला औरंगाबाद शहराच्या एका अत्यंत प्रमुख लोकप्रतिनिधीने मात्र दांडी मारली. औरंगाबाद शहराचे खासदार इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमाकडे सरळ सरळ पाठ फिरवली.

विशिष्ट समाजाचा लोकप्रतिनिधी असल्याचं रुजवण्याचा प्रयत्न?

इम्तियाज जलील (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले आहेत. विकासाची दृष्टी असलेला एक सुशिक्षित खासदार म्हणून इम्तियाज जलील यांना सर्व स्थरातील लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. विजयी झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील सर्व जाती धर्म आणि लोकांचं नेतृत्व करणं अपेक्षित होतं. पण आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला दांडी मारून इम्तियाज जलील यांनी आपण फक्त विशिष्ट समुदायचं प्रतिनिधित्व करत आहोत हे दाखवून दिल्याची टीका इम्तियाज यांच्यावर होत आहे.

इम्तियाज जलील (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) हे खासदार झाल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र जलील यांनी आमदार असताना सुद्धा कधीही या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. इम्तियाज जलील हे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीसह इतर सार्वजनिक आणि शासकीय कार्यक्रमाला सहभागी होतात. मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला ते गैरहजर राहत असतात. त्यामुळे त्यांच्या हेतूवर शंका घ्यायला आता अनेकांना वाव मिळत आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम

मराठवाडा मुक्तीसंग्राम हा मराठवाडा (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) आणि निजाम संस्थानाला निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी लढला गेला होता. निजाम संस्थानातील क्रांतिकारकांचे दमन करण्यासाठी कासीम रिझवी या निझामाच्या क्रूर वजीराने रझाकार नावाची सेना बांधली होती. या सेनेने निजाम संस्थान शाबूत ठेवण्यासाठी अनेक अनन्वित अत्याचार केला. याच्या कहाण्या आजही मराठवाडयातल्या ग्रामीण भागात जुने जाणते लोक सांगत असतात.

निजामाचा अत्याचार वाढल्यानंतर निजाम संस्थानातील लोक गुप्त संघटना स्थापन करून अत्याचारी रझाकरांशी लढायला सुरुवात केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. मात्र 17 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने पोलीस कारवाई घडवून आल्यानंतर निजाम शरण आला आणि मराठवाडा मुक्त (Marathwada Liberation Day Imtiaz Jaleel) झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्यक्षात मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी तब्बल 13 महिने 2 दिवस लागले होते. आजही 17 सप्टेंबर हा दिवस आजही मराठवाडयात स्वातंत्र्यदिनाप्रमाणे साजरा केला जातो. पण या पवित्र दिनाला इम्तियाज जलील गैरहजर राहिले. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

इम्तियाज जलील यांच्या पक्षाचा इतिहास

खासदार इम्तियाज जलील हे ज्या पक्षाकडून निवडून आले आहेत त्या तुला पक्षाची स्थापना 1926 मध्ये निजाम राजवटीत करण्यात आली. सुरुवातीला क्रूरकर्मा कासीम रिझवी या संघटनेचा प्रमुख होता. पण हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यानंतर रिझवी याला पाकिस्तानात निघून जाण्याची मुभा देण्यात आली. त्यावेळी त्याने एमआयएम या कट्टरतावादी संघटनेचे सगळी सूत्र आत्ताचे असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांचे आजोबा अब्दुल वाहिद ओवेसी यांच्या हातात दिली.

अब्दुल ओवेसी हे सुद्धा प्रचंड संप्रदायिकतावादी आणि कट्टरतावादी होते. त्याने भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निझाम राजवटीचा आणि स्वतंत्र राज्याचा होका धरला होता. म्हणूनच ते 17 सप्टेंबर या मुक्तीसंग्राम दिनाला विरोध करत आले आहेत. आणि तोच कित्ता आजही ओवेसी बंधू आणि त्यांचे समर्थक आजही गिरवत असतात. आणि त्यामुळेच इम्तियाज जलील आज मुक्तीसंग्राम दिनाला गैरहजर राहिले, इम्तियाज जलील यांच्या या कृतीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कडक शब्दात टीका केली आहे.

निमंत्रण न दिल्यावर थयथयाट, निमंत्रण असताना दांडी

औरंगाबाद शहरात झालेल्या पंतप्रधान नंरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात आपल्याला निमंत्रण नाही म्हणून इम्तियाज जलील यांनी थयथयाट केला होता. थेट पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवू असंही जलील म्हणाले होते. प्रोटोकॉल नुसार आपला सन्मान झाला नाही असा जलील यांचा दावा होता. मग मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला खासदार म्हणून उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल इम्तियाज जलील कसे काय विसरले? असा संतप्त सवाल आता मराठवाडयातील नागरिक विचारत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.