ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, ‘नरेंद्र’ यांच्या हातावर ‘देवेन्द्र’ टॅटू

एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी सांगितलं

ठाकरेंच्या उमेदवाराच्या मनगटावर फडणवीसांचे नाव, 'नरेंद्र' यांच्या हातावर 'देवेन्द्र' टॅटू
नरेंद्र पाटील यांच्या हातावर देवेन्द्र असा टॅटू
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 3:03 PM

नवी दिल्ली : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

काय म्हणाले नरेंद्र पाटील?

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर देवेन्द्र हे नाव कोरले आहे. विरोधीपक्ष नेते “देवेन्द्र फडणवीस” यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. “त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत” अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

मार्च 2021 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. नरेंद्र पाटील यांनी 2019 मधील लोकसभेची निवडणूक सातारा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष उलटलं, तरी माथाडी कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोडवले नसल्याचं सांगत मार्च 2021 मध्ये नरेंद्र पाटलांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता.

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील विधिमंडळाचे माजी आमदार नरेंद्र पाटलांनी शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सातारा मतदारसंघातून पराभवानंतर दीड वर्षांनी शिवसेनेला रामराम

पाहा व्हिडीओ :

 

संबंधित बातम्या :

आता तारीख नाही, अ‍ॅटॅक होईल, मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका: नरेंद्र पाटील

आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.