Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांडवली करु नका, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंच्या वादात उडी, नरेंद्र पाटलांचा दोन्ही नेत्यांना टोला

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. (Narendra Patil Shashikant Shinde)

मांडवली करु नका, शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंच्या वादात उडी, नरेंद्र पाटलांचा दोन्ही नेत्यांना टोला
नरेंद्र पाटील, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 11:44 AM

सातारा : “साताऱ्यात कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. जो माणूस संघटनेचा होऊ शकत नाही, तो मतदारांचा कसा?” असा सवाल करत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी टीका केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मांडवली करु नका, असं म्हणत नरेंद्र पाटलांनी दोन्ही नेत्यांना टोला लगावला. तर लोकं किती पक्षनिष्ठा बदलतात, याची प्रचिती महाराष्ट्राने घेतली आहे. कोणी गद्दारी केली, हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी नरेंद्र पाटलांना प्रत्युत्तर दिलं. (Mathadi Leader Narendra Patil taunts NCP MLC Shashikant Shinde BJP MLA Shivendraraje Bhosle)

साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. त्यातच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उडी घेत शशिकांत शिंदेंवर जोरदार टीका केली.

नरेंद्र पाटील काय म्हणाले?

“शशिकांत शिंदे यांनी आता तरी आत्मपरीक्षण करावे. गेल्या निवडणुकीमध्ये संघटनेच्या सुपुत्राचा पराभव करण्यासाठी स्वतः शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. गेल्या अनेक निवडणुका माथाडी कामगारांमुळे ते निवडून आले, मात्र आता कोरेगाव तालुक्यातील मतदारांनी योग्य तो निर्णय घेऊन शशिकांत शिंदे यांचा पराभव केला आहे” अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी निशाणा साधला.

“आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष घालू नये” असा सबुरीचा सल्ला माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी विशेष मुलाखतीत दिला. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडवली करु नये, असा टोलाही त्यांनी दोन्ही नेत्यांना त्यांनी लगावला आहे.

शशिकांत शिंदेंचं नरेंद्र पाटलांना उत्तर

नरेंद्र पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना शशिकांत शिंदे यांनीही जोरकस टोला लगावला. “मी नेहमी माथाडी कामगारांच्या बरोबर राहिलो आहे. जिथे पक्षाचा विषय येतो, तिथे नरेंद्र पाटील यांनी त्यांचे निर्णय घेतले. तेव्हा ना त्यांनी माथाडी कामगारांना विचारलं, ना मला. नरेंद्र पाटील यांनी कुणाशी गद्दारी केली आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.” अशा शब्दात शशिकांत शिंदेंनी नरेंद्र पाटलांना सुनावलं. (Mathadi Leader Narendra Patil taunts NCP MLC Shashikant Shinde BJP MLA Shivendraraje Bhosle)

काय म्हणाले होते शिवेंद्रराजे?

“मग.. माझी वाट लागली तरी चालेल, याला संपवायचं ना.. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार, ही आमची भूमिका आहे. काट्याने काटा काढायचा, मी पण मग मागे फिरणारा नाही. मी पण कुणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असा इशारा शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिला होता.

पक्षवाढीसाठी संघर्षाला तयार, शशिकांत शिदेंचे प्रत्युत्तर

आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले की माझ्यामध्ये आणि शिवेंद्रराजेंमध्ये कोणाताही वाद नाही. मी माझं पक्ष वाढविण्यासाठी काम करतो. जावळी मतदार संघामध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. मी माझ्या मतदारसंघामध्ये आता काम करत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे तसं वाटत असावे. मात्र, पक्षवाढीसाठी संघर्ष करायला लागला तर मी तयार आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी जावळीमध्ये काम करत असल्यानं त्यांना माझा हस्तक्षेप वाढलाय, असं वाटलं असावं, शशिकांत शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या :

अहो आश्चर्यम… लग्नकार्यात शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे एकमेकांच्या शेजारी बसतात तेव्हा…..

मी उदयनराजेंविरोधात निवडून आलेला माणूस, समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही : शिवेंद्रराजे

शिवेंद्रराजेंनी दम भरताच शिंदे नेमकं काय म्हणाले? जावळीत राजकीय संघर्ष वाढणार?

(Mathadi Leader Narendra Patil taunts NCP MLC Shashikant Shinde BJP MLA Shivendraraje Bhosle)

टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.