भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार लागली आहे. राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला पक्षाला सत्तेतेन लांब करण्यासाठी शिवसेना (Shiv sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनवलं त्या महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्ष पुर्ण झाली आहेत. तर उर्वरित अडीच वर्ष ही […]
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार लागली आहे. राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला पक्षाला सत्तेतेन लांब करण्यासाठी शिवसेना (Shiv sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनवलं त्या महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) अडीच वर्ष पुर्ण झाली आहेत. तर उर्वरित अडीच वर्ष ही आम्ही पुर्ण करु असे सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते म्हणत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. एक संकट जाते ना जाते तोच दुसरं संकटं आहेच. तिन्ही पक्ष एकत्र असल्याने आता पर्यंत आलेल्या संकंटांना महाविकास आघाडी सरकार म्हणून तोंड दिले आहे. पण आता भाजपने तिंघाविरोधात आघाडी न उघडता एक एक पक्षाला लक्ष करण्याचे काम सुरू केलं आहे. मात्र जास्त करून शिवसेनेलाच अधीक लक्ष करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. शिवसेनेला सात्यत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. भाजपचे हे संकट कमी होताना दिसत नसतानाच आता शिवसेनेला मनसेची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपकडून मनसेला (MNS) ताकद देण्याचे काम सुरू असल्याचेच बोलले जात आहे.
शिवसेनेचा उल्लेख लाचार म्हणून
तसेच भाजप शिवसेनेची युती तुटलीय तेव्हापासून भाजप शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत आहे. आता भगव्यासाठी फक्त भाजप आहे, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत. तर भाजपने वारंवार शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचायले होते. तर तर आता ही भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, खासदार नवित राणा आणि आमदार रवी राणा हे टीका करताना दिसतात. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल चढवत होता. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख लाचार म्हणून केला होता. शिवसेना सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली असा घणाघात त्यांनी केला होता. तर आता शिवसेनेला घेरण्यासाठी भाजप महाराष्ट्र दिनी मुंबईत सभा घेणार असल्याचे कळत आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा होणार आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलणार असल्याचे कळत आहे. तर याच सभेत भाजपकडून मुंबई मनपातील भ्रष्टाचारावर भाष्य करुन पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
मनसेने देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शंख फुंकला
दरम्यान आता मनसेने देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शंख फुंकताना शिवसेनेला डिवचले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आता हातात घेतला आहे. त्यांनी मशिदवरिल भोंग्याना विरोध करताना हनुमान चालीसा म्हणा असा आदेशच त्यांनी दिला. तर हनुमान जयंतीच्या दिवशी महाआरती आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमानंतर आता राज ठाकरेंनी आज पुण्यात दोन घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर जाहीर सभा घेणार आणि दुसरी म्हणजे 5 जून या दिवशी अयोध्येला जाणार. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. भोंग्यांमुळे मुस्लिमांनाही त्रास होतो. त्यामुळे भोंगे उतरवां अन्यथा जशाच तसे उत्तर देण्याचे त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू.