ओबीसी आरक्षण बचावासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक, ३ नोव्हेंबरच्या आंदोलनाची रणनिती निश्चित

ओबीसी आरक्षण बचावासाठी पुण्यात आज ओबीसी समाजाची बैठक पार पडली. यावेळी ३ नोव्हेंबरला होणाऱ्या ओबीसी आंदोलनाची रणनिती ठरवण्यात आली. या बैठकीत ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक, ३ नोव्हेंबरच्या आंदोलनाची रणनिती निश्चित
OBC leader meeting file image
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 2:17 PM

पुणे: ओबीसी आरक्षण बचावासाठी पुण्यात आज ओबीसी समाजाची बैठक पार पडली. यावेळी ३ नोव्हेंबरला होणाऱ्या ओबीसी आंदोलनाची रणनिती ठरवण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी सरकारनं घ्यावी, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्याचबरोबर MPSCसह सर्वच नोकरभरती राबवण्यात याव्या, अशी मागणीही ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. (Meeting of OBC leaders in Pune, preparation for November 3 agitation)

बैठकीवेळी ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात आला आहे. सरकार मराठ्यांना एक न्याय तर ओबीसींना एक न्याय देत आहे. सारथी संस्थेला निधी दिला जातो, मग महाज्योती या संस्थेला का नाही? असा सवालही राज्य सरकारला करण्यात आलाय. पुण्यातील उद्यान प्रसाद कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज्यातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा – मराठा मोर्चा

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. ‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको’, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

विजय वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन मराठा मोर्चा आक्रमक

आम्हाला स्वतंत्र 9 टक्के आरक्षण द्या, राज्यातील बारा बलुतेदार समाजाची पालकमंत्र्यांकडे मागणी

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन

Meeting of OBC leaders in Pune, preparation for November 3 agitation

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.