Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urmila Matondakar | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिला मातोंडकरला फोन केल्यामुळे ती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Urmila Matondakar | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?
Follow us
| Updated on: Sep 17, 2019 | 8:24 AM

मुंबई : काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा (Urmila Matondkar Shivsena) आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर उर्मिला शिवबंधन बांधणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. याला निमित्त ठरलं ते शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिलाला केलेला फोन (Urmila Matondkar Shivsena).

गेल्याच आठवड्यात उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला रामराम ठोकला होता. पक्षांतर्गत राजकारण सोडवण्यासाठी आपला वापर झाल्याची उद्विग्नता उर्मिलाने व्यक्त केली होती. त्यावेळी पक्षांतराबाबत उर्मिलाने मौन बाळगलं होतं. मात्र आठवडाभरानंतर उर्मिला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेह आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय संबंध जोडू नका, असं आवाहन शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे. उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा (Urmila Matondkar Shivsena) नार्वेकरांनी केला आहे.

राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसप्रवेश

राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने मार्च महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच तिला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टी  यांनी उर्मिला मातोंडकरला पराभवाची धूळ चारली होती.

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, कारण…

सध्या कलात्मक स्वातंत्र्यावर गदा आली आहे, त्यामुळे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करत राहणार आहे, फक्त निवडणुकांपुरते काम न करता, नेहमीच काम करेन, असं उर्मिला मातोंडकर काँग्रेसप्रवेशावेळी म्हणाली होती.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकरने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.

45 वर्षीय उर्मिला मातोंडकरने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिलाच्या डान्सचेही चाहते आहेत. तिने काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नव्हती. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात ती झळकली.

राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिलाने अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. मात्र तिने शिवसेनेत प्रवेश केल्यास ही ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या 

मी धर्मांतर केलेलं नाही, माझा धर्म विचारणारे हे कोण? उर्मिलाकडून टीकाकारांचा समाचार  

माझ्यावर हल्ला करण्यासाठी भाजपने गुंड पाठवले : उर्मिला मातोंडकर

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.