‘या’ विषयावर सामनात अग्रलेख लिहून दाखवा, ओवेसींचं ठाकरेंना आव्हान

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi Challenge Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले आहेत.

'या' विषयावर सामनात अग्रलेख लिहून दाखवा, ओवेसींचं ठाकरेंना आव्हान
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 7:57 AM

मुंबई:ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi Challenge Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना समान नागरी कायदा म्हणजे काय (What is Uniform Civil Code) यावर सामना दैनिकात अग्रलेख लिहून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे आव्हान स्वीकारणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ओवेसी म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं. ते भाजप अध्यक्षांना समान नागरी कायदा लागू करा, असं सांगत आहेत. त्यांची मागणी ठीक आहे. आता त्यांनी समान नागरी कायदा म्हणजे काय यावर आपल्या सामना दैनिकात अग्रलेख लिहून दाखवावा. तुम्हाला जे समजलं असेल नसेल ते लिहा. तुमचं वर्तमानपत्र आहे, तुम्ही काळा करु शकता.”

असदुद्दीन ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्याचाच भाग म्हणून ते बुधवारी नांदेड येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.

एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेली असली तरी प्रकाश आंबडेकरांनी युतीचे सर्व मार्ग खुले असल्याचं वारंवार सांगितलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारे इम्तियाज जलील यांनी देखील अनेकदा सार्वजनिक मंचावर वंचितने जागा वाढवल्यास युतीची तयारी असल्याचं बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित एमआयएम सोबत येणार की स्वतंत्र लढणार हे पाहावे लागणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.