काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक
सोलापूर : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना आज 2 जूनला अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूरातून तौफिक शेखला यांना अटक केली. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम […]
सोलापूर : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना आज 2 जूनला अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूरातून तौफिक शेखला यांना अटक केली. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे. रेश्मा पडेकनूर यांची हत्या झाल्यापासून तौफिक शेख हे फरार होते.
एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांच्या विरोधात सोलापूरातील बाजार पोलीस स्टेशनमध्ये 17 मे रोजी विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रार दिल्यानंतर रेश्मा गायब होत्या. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. रेश्मा यांच्या हत्येनंतर तौफिक शेख हा फरार होता. त्यामुळे या हत्येमागे तौफिक शेखचा हात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता.
तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रेश्मा यांनी सुद्धा तौफिक विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे.