राज्यात सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सवाल

राज्यात पाच वर्ष सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, असा प्रश्न एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel criticized on Pankaja Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विचारला.

राज्यात सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना सवाल
Follow us
| Updated on: Jan 27, 2020 | 11:56 PM

औरंगाबाद : राज्यात पाच वर्ष सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का, असा प्रश्न एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel criticized on Pankaja Munde) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विचारला. पंकजा मुंडे यांनी आज (27 जानेवारी) औरंगाबादमध्ये मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणावर इम्तियाज जलील यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सडकून टीका केली. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल (Imtiyaz Jaleel criticized on Pankaja Munde) होत आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, “राज्यात पाच वर्ष सत्ता होती. तेव्हा काय गोट्या खेळत होता का, त्यावेळी का या गंभीर प्रश्नांसाठी तुम्ही काही केलं नाही. सत्ता असताना काही केलं नाही, मग आता कशाला नौटंकी करता.”

“तुम्ही औरंगाबादमध्ये एकत्र आला आहात, आम्ही एवढे मुर्ख नाही किंवा जनता एवढी मुर्ख नाही. उद्या तुमचे समर्थक तुम्हाला प्रश्न विचारतील की जेव्हा सत्तेत होता तेव्हा का केलं नाही, सत्ता गेल्यावर नौटंकी कशाला”, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडेंनी आज उपोषण केले होते.

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठवाडा पाणी प्रश्नी आंदोलन छेडण्याचे संकेत दिले होते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.