‘मुंबई 24 तास’ 26 जानेवारीपासून सुरु, ‘या’ भागात हॉटेल, मॉल सुरु राहणार
येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगित तत्त्वावर मुंबईत निश्चित केलेल्या ठिकाणी रात्रभर हॉटेल्स, मॉल, थिएटर सुरु ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची ‘24 तास मुंबई’ (Mumbai night life)ही संकल्पना लवकरचा प्रत्यक्षात येणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून प्रायोगित तत्त्वावर मुंबईत निश्चित केलेल्या ठिकाणी रात्रभर हॉटेल्स, मॉल, थिएटर सुरु ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला (Mumbai night life) येणार आहे.
या प्रस्तावानुसार येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात 24 तास हॉटेल्स, मॉल सुरू राहतील. शिवाय मर्यादित आणि निवासी भाग नसलेल्या परिसरात हॉटेल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार आहे.
आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
दरम्यान, याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “मी टीकेल उत्तर देणार नाही. या 27 जानेवारीपासून (26 च्या मध्यरात्री पासून) मुंबई 24 तास सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईत 24 राहणारी लोक आहेत, रात्री काही घ्यायचं असेल, किंवा काही खायचं असेल तर जाणार कुठे? मॉल आणि मिल कम्पाऊंडमध्ये जिथे रहिवासी परिसर नाही, अशा ठिकाणी सुरु करणार आहोत. 2017 मध्ये असा कायदा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी या 26 जानेवारीपासून आपण करणात आहोत. तो कायदा कुठेच हलवला गेला नाही. यातून महसूल आणि नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल”.
या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकेल. मात्र 2017 मध्येच याचा निर्णय झाला आहे. दुकानं किती वेळ सुरु ठेवायची हे आम्ही कोणाला सांगणार नाही. यासाठी कोणतेही बंधन नसेल, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.
आदित्य ठाकरेंची भूमिका काय?
आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी अनेकवेळा आपली भूमिका जाहीर केली आहे., “मुंबईकरांनी मुंबई 24 तासचं स्वागत केलं आहे. जगभरात पाहिलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलियन पाऊंडची आहे. दुकानं, हॉटेल्स आणि थिएअटरसोबत बीएसटीच्या बस ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा यांच्याही उत्पादनात वाढ होणार आहे. आत्ताही मुंबई 24 तास सुरुच राहते. कितीतरी अशी ठिकाणं आहेत जिथं रात्रभर हॉटेल्स सुरु असतात. या इकॉनॉमिला अधिकृत करणं गरजेचं आहे. म्हणजे यांच्या उत्पादनासोबत राज्याकडेही कर येईल. यामुळे रोजगारही तिप्पट होऊ शकतो.”
संबंधित बातम्या
आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला गृहमंत्री देशमुखांचा ‘दे धक्का’?
मुंबईची माहिती नसणारेच विरोध करताहेत, प्रकाश आंबेडकरांचा आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला पाठिंबा