BJP : कार्यकर्ते भिजतायत, मी छत्री कशी घेऊ? भाजप खासदार अनुराग ठाकुरांची अंबरनाथमध्ये हवा…

पक्षाचे संघटन आणि लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये त्यांनी पदाधिकारी आणि प्रतिनीधी यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष वाढवण्यासाठीची तयारी करुन घेतली. तर मंगळारी अंबरनाथ शहरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी थेट रॅलीचे आयोजन केले होते.

BJP : कार्यकर्ते भिजतायत, मी छत्री कशी घेऊ? भाजप खासदार अनुराग ठाकुरांची अंबरनाथमध्ये हवा...
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भर पावसामध्ये अंबरनाथ येथे रॅली काढली
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 2:52 PM

ठाणे :  (BJP Party) भाजपाने लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने तयारी सुरु केली असून (Central Minister) केंद्रातील 9 मंत्री हे राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात दाखल होत आहेत. (Anurag Thakur) मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून लोकप्रतिनीधींशी देखील संवाद साधला आहे. दोन दिवसांच्या कार्यक्रमानंतर आज अंबरनाथ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रॅली सुरु असतानाच अचानक पावसाला सुरवात झाली. मात्र, कार्यकर्ते भिजत आहते तर मी कशी छत्री घेऊ? असे म्हणताच कार्यकर्त्यांमध्येही जोश निर्माण झाला. भर पावसामध्ये त्यांनी रॅली सुरुच ठेवली. अंबरनाथ येथील या दृष्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेल्या सभेची आठवण झाली.

मंत्र्याबरोबर कार्यकर्तेही भर पावसामध्ये

अंबरनाथ येथील रॅली शहाराच्या ऐन मध्यावर आली असताना पावसाला सुरवात झाली. यावेळी अनुराग ठाकूर यांना छत्री देण्यात आली, पण कार्यकर्ते भिजत असताना मी कशी छत्री घेऊ असे म्हणत, त्यांनी नकार दिला. जीपमध्ये उभा राहून ते रॅलीत सहभागी झाले होते. तर त्यांच्या मागे शकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते.

दोन दिवसांच्या बैठकानंतर आज थेट जनतेमध्ये

पक्षाचे संघटन आणि लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये त्यांनी पदाधिकारी आणि प्रतिनीधी यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष वाढवण्यासाठीची तयारी करुन घेतली. तर मंगळारी अंबरनाथ शहरातील जनतेशी संवाद साधण्यासाठी थेट रॅलीचे आयोजन केले होते.

9 मंत्री अन् 16 मतदारसंघ

लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने भाजपाने तयारी सुरु केली आहे. राज्यातील ज्या भागात योग्य ती रचना असणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री दाखल होत आहेत. बारामती मतदार संघात अर्थमंत्री निर्मला सितारमन येणार आहेत. कल्याणमध्ये अनुराग ठाकू हे गेल्या दोन दिवसांपासून आहेत. स्थानिक समस्या आणि थेट जनतेशी संवाद साधून लोकसभा मिशन साध्य करण्याचा भाजपाचा मानस आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.