मुंबई : “पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाही. जे काही (Minister Chhagan Bhujbal) करतात, ते 10-15 दिवस चर्चा करुन मार्ग काढतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्णय घेतात. भाजपसारखे ऑपरेशन लोटस करत नाहीत. ते त्यांनाच जमतं. एकापाठोपाठ राज्य जात आहेत. लोक ठरवतील कुणाचं ऑपरेशन कसं करायचं ते”, असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला.
भारतीय रिपब्लिकन पार्टी-बहुजन महासंघ, वंचित बहुजन (Minister Chhagan Bhujbal) आघाडीचे माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह 47 पदाधिकाऱ्यांनी वंचित आघाडी सोडली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी बैठक झाली. या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले
यावेळी मिलिंद एकबोटे आणि राज ठाकरे भेटीवरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे राजकारणी आहेत. त्यांना भेटू दे कुणाला भेटायचं आहे. कुठली लाईन घ्यायची, हे त्यांना कळायला हवं. प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचल्यानंतर त्यांनी विचार करायला हवा, की कुठे जायचं काय करायचं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 7 मार्चला अयोध्या दौरा केला आणि दौऱ्यादरम्यान आम्ही हिंदुत्व सोडलं नसल्याचं स्पष्ट केलं. यावर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचं समर्थ केलं असून हिंदुत्व भाजपची एकट्याची मक्तेदारी नाही, असं म्हटलं.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठे हिंदुत्व सोडलं. हिंदू ही भारताची संस्कृती. मी पण हिंदू, हिंदुत्व भाजपच्या एकट्याची मक्तेदारी नाही. सगळ्यात आधी हिंदुत्वावर जर कुणी बोललं असेल, तर ते बाळासाहेब ठाकरे बोलले आहेत. हिंदुत्वाच्या गप्पा मारता. जेव्हा बाबरी मशीद शहीद झाली, तेव्हा म्हणाले की आमचा काहीही संबंध नाही. हे असं हिंदुत्व, घाबरणारं, हे बावळटपणाचं हिंदुत्व आहे. बरोबर केलं, की चूक केलं, सांगितलं नाही. मागे हटले. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, मी केलं. त्यांच्या भूमिकेबरोबर उभं राहण्याची त्यांची जीद्द होती. ती जीद्द भाजपकडे नाही
वंचित नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेश
“वंचितच्या नेत्यांनी राजीनामा दिला. 40 च्यावर नेत्यांनी राजीनामा दिला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करायचं आहे. त्यावर आज बैठकीत चर्चा होईल, निर्णय होईल”, असं छगन भुजबळ यांनी वंचित नेत्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुद्यावर सांगितलं.
भुजबळांची चंद्रकांत पाटलांवर टीका
“चंद्रकांत पाटलांना सांगा की, तुम्ही भूमिका बदलत नाही का? बाबरीच्या वेळी भूमिका बदलली, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन केलं. उत्तर प्रदेशात काय केलं. आमदार फोडले, आमदार फोडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय समजायचा?”, असं म्हणत (Minister Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या :
वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते : छगन भुजबळ
शरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ
आघाडी सरकारच्या काळात अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा, छगन भुजबळांचे आदेश
‘तलवारी जुन्या झाल्या आता नवे शस्त्र आले’, छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला