दाऊदच्या सात पिढ्या खाली आल्या तरी ‘मातोश्री’चे वाकडे करु शकणार नाही, एकनाथ शिंदेंची गर्जना
मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत.
मुंबई : “मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे (Eknath Shinde Slams Dawood Ibrahim). दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत”, असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असेलेलं ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती आहे (Eknath Shinde Slams Dawood Ibrahim).
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती होती. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली, असं सांगण्यात आलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर आलं. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
त्यानंतर आता शिवेसेनेचे नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत मातोश्रीचं कोणी वाकडं करु शकत नाही असं म्हटलं. “मातोश्री हे मराठी माणसाचे सन्मानाचे स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचे वाकडं करु शकणार नाहीत. पाकिस्तान देखील मतोश्रीचे वाकडे करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याच आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde Slams Dawood Ibrahim
मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही – अनिल परब
“मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. तो दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही”, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
“या कॉलबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेतला जात आहेत. तो आढावा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे”, असं अनिल परब म्हणाले (Eknath Shinde Slams Dawood Ibrahim).
संबंधित बातम्या :
होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली
खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….