Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना

| Updated on: Sep 24, 2020 | 5:12 PM

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. (Minister Eknath Shinde Tested Corona Positive)

Eknath Shinde | पीपीई कि्टस घालून रुग्णालयांची पाहणी, एकनाथ शिंदेंना कोरोना
Follow us on

मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी पीपीई किट्स घालून सातत्याने रुग्णालयांची पाहणी केली होती, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिंदे यांची प्रकृती उत्तम असून त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. (Minister Eknath Shinde Tested Corona Positive)

एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली. “गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने काल त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठिक आहे. काळजी करू नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून शिंदे हे सातत्याने रुग्णालयांना भेटी देत आहेत. पीपीई किट्स घालून रुग्णालयांना भेटी देतानाच कोरोना रुग्णांशीही ते संवाद साधत आहेत. तसेच भिवंडीतील इमारत दुर्घटना असो, विदर्भातील पूर असो की नक्षलग्रस्त गडचिरोलीची पाहणी असो इत्यादी ठिकाणी शिंदे सातत्याने हजर राहिले होते. त्यामुळे त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आला होता.

 

दरम्यान, शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  “अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या कार्याचा झंझावात सुरूच आहे. आता मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. भरपूर विश्रांती घ्या. योग्य उपचारानंतर आपण लवकर बरे व्हाल आणि पुन्हा जनसेवेत झोकून द्याल,” असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. आमदार अजय चौधरी, आमदार विश्वजीत कदम आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही शिंदे यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Minister Eknath Shinde Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Covid-19 Vaccine | अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात, 60 हजार जणांवर प्रयोग

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली