विधानसभेच्या अध्यक्षपदी के.सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा, खुद्द पाडवी काय म्हणतायत वाचा…

| Updated on: Feb 15, 2021 | 12:14 PM

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचं के.सी. पाडवी म्हणाले. | K C padvi

विधानसभेच्या अध्यक्षपदी के.सी. पाडवी यांच्या नावाची चर्चा, खुद्द पाडवी काय म्हणतायत वाचा...
के सी पाडवी
Follow us on

नंदूरबार : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची निवड झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी (K C Padvi) यांचे नावही आघाडीवर आहे. याच संदर्भात एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे. (Minister K C  Padvi Statement On Assembly Speaker)

“राजकारणात चर्चा होत असतात. तशीच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे, असं के.सी. पाडवी यांनी स्पष्ट केलं. नंदूरबारच्या धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात विविध विकास कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेअगोदर माझ्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्षपदासाठी होत होती. राजकारणात चर्चा कायम होत असतात. मात्र अशा परिस्थितीत आपण  न थांबता पक्षासाठी काम करत राहणं महत्त्वाचं असतं. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष जी जबाबदारी देईल ती पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

सध्या के.सी. पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली आहे. याच आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आदिवासी विकास विभागाची भूमिका महत्वाची ठरेल तसंच आदिवासी माणूस मुख्य प्रवाहात कसा येईल, त्याचा विकास कसा होईल, यासाठी मी प्रयत्न करतो आहे, असे पाडवी यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार?

नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यात पृथ्वीराज चव्हाणांपासून ते के.सी.पाडवी यांच्या नावापर्यंत चर्चा होतीय. त्यातच काँग्रेसचे पुण्यातील भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. विधानसभा सभापती म्हणून काँग्रेस थोपटेंवर विश्वास दाखवू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या काँग्रेसमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट दिसतात. त्यात थोपटे सभापती झाले तर विदर्भाला मिळालेला मान पुन्हा प. महाराष्ट्रात आलेला दिसेल.

(Minister K C  Padvi Statement On Assembly Speaker)

हे ही वाचा :

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन