Video | फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे!, वाचा गडकरींचे भन्नाट फटके आणि आयडिया
फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना जोरदार चिमटे काढले. | Nitin Gadkari
नागपूर : फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना जोरदार चिमटे काढले. कुणालाही आता फुकटंच देणार नाही. काहीतरी देण्यासाठी एक रुपया तरी घेणारच, असं गडकरी म्हणाले. (Minister Nitin Gadkari Sadak Suraksha Karyakram)
नितीन गडकरी यांनी नागपूरच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. लोकांना आतापर्यंत फुकटचं घ्यायची सवय लागलीय. आम्हीही आतापर्यंत द्यायचो. पण फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे. म्हणून आता कुणालाही फुकटंच देणार नाही, असं गडकरी म्हणाले.
आता फुकट काहीच देणार नाही
गीर गायीचं व्यावसायिक महत्त्व गडकरींनी पटवून दिलं. गीर गाय ब्राझीलमध्ये 62 लीटर दूध देते. त्या गाईंचं वीर्य भारतात आणण्यात आलंय. यावर संशोधन सुरु झालं. नागपुरात त्याची प्रयोगशाळा आहे. गाईच्या शेणापासून पेंट तयार होईल. तसंच गाईचं शेण 5 रुपये किलो दराने विकलं जाणार आहे. या सगळ्यावर एक फिल्म तयार केलीय. पण लोकांना ही फिल्म फुकटात दाखवणार नाही. चित्रपट दाखवायचा एक रुपया तरी घेणार नाहीतर माझ्याजवळ हरामचा माल आहे, अशी लोकांची धारणा व्हायची, असं गडकरी म्हणाले.
देशातली 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस
आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसनस सहज मिळते. देशात 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस निघाले, असं गडकरी म्हणाले. रस्त्यात वाहनं उभी केल्यास, त्याचा मोबाईल फोटो पाठवायला सांगणार. त्याचा अर्धा दंड फोटो काढणाऱ्याला आणि अर्धा दंड सरकारला देणार, असंही गडकरी म्हणाले. नागपुरातील अपघाताचे 61 पैकी 31 ब्लॅक स्पॅाट सुधारण्यात आले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
गडकरींच्या साथीने मकरंद अनासपुरेंची जोरदार बॅटिंग
गेल्या १० वर्षात रस्त्याची स्थिती पाहिली तर आनंद होतो. गडकरींनी देशाच्या रस्ते विकासात सिंहाचा उचलला आहे. म्हणून गडकरी यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो, अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बोवून दाखवल्या.
शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याचं मोठं आव्हान असतं. रस्ता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड वाढवायला हवा. युद्ध किंवा महामारीपेक्षा जास्त लोक अपघातात मरतात, असंही अनासपुरे म्हणाले. तसंच भ्रष्टाचारावर बोलताना अनासपुरे यांनी एकदम कडक सल्ला दिला. लाच घेणाऱ्यांकडून ५०० पट दंड घ्या, लाच घेणं बंद होईल, असं ते म्हणाले.
(Minister Nitin Gadkari Sadak Suraksha Karyakram)
हे ही वाचा :
Nitin Gadkari | मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा जुना व्हिडीओ व्हायरल