Prajakt Tanpure | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना कोरोना, कोरोनाला हरवून लवकरच पुन्हा सेवेत येणार, ट्वीट करत माहिती

उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Prajakt Tanpure | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना कोरोना, कोरोनाला हरवून लवकरच पुन्हा सेवेत येणार, ट्वीट करत माहिती
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 3:34 PM

अहमदनगर : विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (Prajakt Tanpure Corona Positive) सुरु असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. प्राजक्त तनपुरे यांची काम कोरोना चाचणी करण्यात आली होती (Prajakt Tanpure Corona Positive).

“सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार”, असं ट्वीट मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं.

Prajakt Tanpure Corona Positive

राज्यात विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवनेशन आज आणि उद्या (8 सप्टेंबर) घेण्यात येत आहे. मात्र, यादरम्यान राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

शिवसेना आमदार महेंद्र दळवींना कोरोना

तर आज रायगडमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज अर्ध्या वाटेत असताना आला. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच तात्काळ ते माघारी फिरले. कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील दहा दिवस आपण घरीच क्वारंटाईन राहणार असल्याने त्यांनी सांगितले (Prajakt Tanpure Corona Positive).

संबंधित बातम्या :

पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन

शिवसेना आमदार अधिवेशनासाठी मुंबईकडे, वाटेतच मेसेज, कोरोना पॉझिटिव्ह

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.