Shambhuraj Desai : ‘ते काय स्वातंत्र्य लढ्यात तीन महिने तुरुंगात जाऊन आले काय?’, मंत्री शंभूराज देसाई यांचा या नेत्यावर हल्लाबोल, जंत्री काढण्याचा दिला इशारा..
Shambhuraj Desai : शंभूराज देसाई यांच्या संतापाचा असा कडेलोट झाला..
सातारा : राज्यात ठाकरे गट आणि शिंदे गटातील कलगीतुरा पुन्हा रंगला. गद्दारीवरुन आज दोन्ही बाजूने घमासान सुरु होते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गद्दारीचा मुद्दा पुन्हा उचलल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जोरदार पलटवार केला. संजय राऊत कोण आहेत, ते काय स्वातंत्र्य लढ्यात तीन महिने तुरुंगात जाऊन आले आहेत काय? असा सवाल करत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. दोन्ही नेत्यांचे वाकयुद्ध आज चर्चेचा विषय ठरले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. गद्दारीचा शिक्का कायम राहिल. तो काही केल्या पुसणार नाही. पिढ्यान पिढ्यांना गद्दारी जगू देणार नसल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. त्यानंतर दोन्ही गटात दिवसभर वाद-प्रतिवाद सुरु होता.
याप्रकरणी शंभूराजे देसाई यांनी ही तुफान बॅटिंग केली. गद्दारीबाबत बोलणारे संजय राऊत कोण? असा सवाल त्यांनी केला. ते काय स्वातंत्र्य लढ्यात तीन महिने तुरुंगात जाऊन आले आहेत काय? असा हल्लाबोल देसाई यांनी केला.
त्यांच्यावर कसला शिक्का आहे, चौकशीची जंत्री बाहेर आली तर असे सूचक वक्तव्य करत, देसाई यांनी संजय राऊत यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. तीन-साडेतीन महिने त्यांनी तुरुंगात आराम केला आहे, असे ते म्हणाले.
संजय राऊत यांना आरामाची सवय लागली आहे. आता बाहेर आल्यावर त्यांनी नाहक तण तण करु नये, हे त्यांना सोसणार नाही, असा इशाराही देसाई यांनी दिला. गद्दारी प्रकरणावरुन राऊत यांनी शिंदे गटातील सर्वांवरच तिखट प्रतिक्रिया दिली.
एवढंच नाही तर, सीमावादावरुन कर्नाटक सरकारवर हल्ला बोल करताना, चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर हल्ला चढविला. मंत्र्यांनी बेळगावला जाण्याचे ढोंग करु नये, त्यांनी जाणून दाखवावे, असा टोला राऊत यांनी हाणला.