एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, महायुतीच्या मंत्र्याकडून गणरायाला साकडं

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, महायुतीच्या मंत्र्याकडून गणरायाला साकडं
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 6:45 PM

Shambhuraj Desai on Eknath Shinde : सध्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलं आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच आता महायुतीचे नेते आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्रिपदावरुन एक मोठे वक्तव्य केले आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं, अशी इच्छा शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली.

शंभूराज देसाई यांनी नुकतंच पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर सर्व्हे वेगवेगळे येत असतात. दगडूशेठ मंदिरासमोर सांगतो, महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार आणि पुन्हा महायुती सत्तेत येणार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं. मात्र मुख्यमंत्री पदाचा निर्णय महायुतीतले तिन्ही नेते घेतील, असे शंभूराज देसाई म्हणाले.

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, नवीन योजना होती, अनावधाने नावं घेतलं जात नव्हतं आता घेतलं जाणार आहे. महायुतीतील सगळे पक्ष आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख करत आहेत, असेही शंभूराज देसाईंनी म्हटले. यावेळी त्यांनी आम्हाला अजितदादांचा त्रास होत नाही”, असेही म्हटले.

“त्यांचा जाहीरनामा येऊ दे मग बघू”

“आमदार आपत्रतेसंदर्भात ऑक्टोबरची तारीख आहे असं कळलं आहे, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. तसेच राज्याचा म्हणून एक जाहीरनामा असण्याची गरज आहे. जिल्ह्याचा, गावाचा असा जाहीरनामा नसतो, त्यांचा जाहीरनामा येऊ दे मग बघू”, असेही शंभूराज देसाईंनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?

गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. यात भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजित पवार गटाला 70 जागा मिळू शकतात, असे बोललं जात आहे. मात्र काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय महाविकासाआघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागाही आम्हाला द्या, अशीही मागणी करण्यात आली.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.