Uday Samant : विनायक राऊत अध्यात्मिक व्यक्ती आता त्यांनीच काय ते सत्य सांगावं; पैसे वाटल्याच्या आरोपाला उदय सामंतांचे प्रत्युत्तर

वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना पाडण्यासाठी उदय सामंत(Uday Samant) यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.आता विनायक राऊत यांच्या या आरोपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Uday Samant : विनायक राऊत अध्यात्मिक व्यक्ती आता त्यांनीच काय ते सत्य सांगावं; पैसे वाटल्याच्या आरोपाला उदय सामंतांचे प्रत्युत्तर
मंत्री उदय सामंत
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 9:38 AM

मुंबई : वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना पाडण्यासाठी उदय सामंत(Uday Samant) यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.आता विनायक राऊत यांच्या या आरोपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत, सिंधुदूर्गातील घाटीखाली उभं राहून सत्य काय आहे त्यांनी सांगितलं पाहिजे असा टोला सामंत यांनी राऊतांना लगावला आहे. सिंधुदूर्गातील देवळाच्या घाटीखाली उभं राहून सांगितलं तर खरं आहे असं माणण्यात येईल.राऊत यांनी खरं सांगावे माझ्याकडून कुणी पैसे घेतले? राऊत वयाने मोठे त्यांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य नाही, काळ आणि नियती हेच त्यावर उत्तर देतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

राऊत यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

उदय सामंत यांनी वैभव नाईकांना पाडण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. आता राऊत यांच्या या आरोपाला सांमत यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. राऊत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांच्या आरोपांना उत्तर देणं योग्य होणार नाही. येणारा काळच त्यांच्या आरोपांची उत्तरे देईल.विनायक राऊत हे अध्यात्मिक व्यक्ती आहेत, सिंधुदूर्गातील घाटीखाली उभं राहून सत्य काय आहे त्यांनी सांगितलं पाहिजे असा टोला सामंत यांनी राऊतांना लगावला आहे. दरम्यान आता उदय सामंत यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

विनायक राऊतांचा सांगोल्यात मेळावा

शिवसेनेमध्ये गळती सुरूच आहे. गळती थोपवण्यासाठी तसेच पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सध्या राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. याचा पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत हे शाहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.शाहाजीबापू पाटील हे शिवसेनेतून फूटून शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या मतदासंघामध्ये शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा असणार आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते काय बोलणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.