रत्नागिरी : महाराष्ट्रमध्ये जी सुरुवात महाविकास आघाडीने केली त्याचीच पुनरावृत्ती बिहार निवडणुकीत होणार असल्याचं भाकित शिवसेना नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. येत्या 10 तारखेला बिहारच्या जनतेच्या मनात काय आहे हे नक्की सिद्ध होईल मात्र एनडीएचं सरकार बिहारमध्ये नक्कीच येणार नाही, असा दावा सामंत यांनी केला. (Minister Uday Samant on Bihar Eletion)
उदय सामंत यांनी पत्रकार घेत बिहार निवडणूक, मराठा आरक्षण, यूजीसी गाईडलाईन्स या मुद्द्यांवर भाष्य केलं. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला लोक नाकारतील आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढलेल्या तेजस्वींना लोक पसंती देतील, असं उदय सामंत म्हणाले.
“मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे विनायक मेटे काय म्हणतात यापेक्षा मुख्यमंत्री काय म्हणतात ते माझ्यासाठी महत्त्वाचा आहे”, असं उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. ओरस इथल्या शरद कृषी भवन इथे सामंत-जयंत पाटील यांची भेट झाली. राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्गात राजकारणाची वेगळी नांदी मानली जातेय. दोन्हीही नेत्यांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाली. जयंत पाटील माझे मार्गदर्शक आहेत. म्हणून मी त्यांना भेटलो, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. भेटीमागचं वेगळं काहीही राजकीय गिमिक नाही. सिंधुदुर्गसाठी वेगळी स्टॅटर्जी करावी लागत नाही, सिंधुदुर्गवासियांनी स्टॅटर्जी ठरवली आहे. त्यामुळेच अनेक गोष्टी घडल्यात असं नाव न घेता उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष राणे यांना टोला लगावला.
युजीसी गाईडलाईन अंतर्गत दिवाळीनंतर सर्व राज्यातील कुलगुरूंची बैठक घेणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
(Minister Uday Samant on Bihar Eletion)
संबंधित बातम्या
Uday Samant | कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही- उदय सामंत