Uday Samant | आज पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी 15 जण शिंदे गटात येणार, आता शोधा, मंत्री उदय सामंतांचं महाविकास आघाडीला आव्हान!

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांना गद्दार म्हटलं जातंय, यावरून उदय सामंत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ' कुणी ही गद्दार म्हणतंय बाडगे म्हणताय.. ही वैयक्तिक टीका केली जातेय.

Uday Samant | आज पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी 15 जण शिंदे गटात येणार, आता शोधा, मंत्री उदय सामंतांचं महाविकास आघाडीला आव्हान!
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 6:27 PM

मुंबईः आज विधानभवनात (Maharashtra Assembly) पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी 15 जण घोषणा देत नव्हते. ते पुढील काही दिवसात एकनाथ शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलाय. पण नेते कोण होते, हे मी आत्ता सांगत नाही, ती तुम्ही शोधा असं आव्हानही उदय सामंतांनी केलंय. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी शिंदे गटात आज प्रवेश केला. त्यांच्यासारखेच बरेच आहे ज्यांना प्रवेश करायचाय, शिंदे गटात (Eknath Shinde Group) कोण येणार ही नावे सांगितली की त्या नेत्यांना त्रास होईल, असं वक्तव्यही सामंत यांनी केलंय. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केलं. आज सत्ताधारी भाजप-शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीतील आमदार यांच्यात विधानभवन परिसरात चांगलीच धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी परस्परांवर आक्रमकपणे आरोप केले.

15 नेत्यांनी घोषणाच दिल्या नाहीत…

एकनाथ शिंदे गटात आगामी काळात महत्त्वाचे नेते येणार असल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. ते म्हणाले, शिंदे गटातील नेत्यांनी जर इतरांशी बातचित केली किंवा सेना गटाशी बातचीत केली तर त्यात चर्चा करण्याचं कारण नाही. आज पायऱ्यांवर जे लोक आंदोलन करत होते त्यात 15 नेते असे होते ज्यांनी घोषणा दिल्या नाहीत… हे सगळे भविष्यात शिंदे गटात येणार… हे कोण आहेत ते आत्ता तुम्ही शोधा… आमच्यासाठी हा विषय मिटलाय.. आम्ही आमचं चोख काम करतोय… जो आडवा येईल त्याला त्याच भाषेत ऊत्तर दिलं जाईल…

‘बंडगुजा हा नवा शब्दप्रयोग, हे योग्य नाही’

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेल्यांना गद्दार म्हटलं जातंय, यावरून उदय सामंत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ कुणी ही गद्दार म्हणतंय बाडगे म्हणताय.. ही वैयक्तिक टीका केली जातेय. आपण टीका करतोय, मग दुसऱ्याने टीका केल्यावर राग येऊ देऊ नये… नाही तर अशा फंद्यात पडूच नये…जे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हा त्यांनी आपले आई-वडील विकले, असे आरोप झाले. पण आमचे घरचे हे घरचे नाहीत का? तुम्ही वैयक्तिक बोलणं कितपत योग्य आहे? बंडगुजा हा नवीन शब्द प्रयोग करण्यात आला आहे, हे योग्य नाही, अशी नाराजी उदय सामंत यांनी व्यक्त केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.