मीरा भाईंदर महापौर निवडणूक : काँग्रेस नगरसेविका स्ट्रेचरवरुन महापालिकेत

मीरा भाईंदर महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असल्यामुळे काँग्रेस नगरसेविका उमा सपार मतदानासाठी रुग्णालयातून महापालिकेत दाखल झाल्या

मीरा भाईंदर महापौर निवडणूक : काँग्रेस नगरसेविका स्ट्रेचरवरुन महापालिकेत
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 11:48 AM

मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान होत आहे. सत्ताधारी भाजपसमोर महाविकास आघाडीचं कडवं आव्हान आहे. आजारी असलेल्या काँग्रेस नगरसेविका उमा सपार थेट रुग्णालयातून महापालिकेत आल्या.(Mira Bhaindar Corporator on Stretcher)

काँग्रेस नगरसेविका उमा सपार आजारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचं असल्यामुळे सपार मतदानासाठी रुग्णालयातून महापालिकेत दाखल झाल्या. रुग्णवाहिकेने हॉस्पिटलपासून महापालिकेपर्यंतचा प्रवास केल्यानंतर त्यांना स्ट्रेचरमधून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर व्हिलचेअरवर बसवून त्यांना महापालिकेत नेण्यात आलं.

हेही वाचा : मीरा भाईंदर महापौर निवडणूक : सत्ताधारी भाजप जिंकणार की शिवसेना चमत्कार करणार?

मीरा भाईंदर महापौरपदासाठी भाजपकडून ज्योत्स्ना हसनाळे, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या अनंत शिर्के यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपकडून मदन सिंह, तर ‘मविआ’तर्फे मर्लिन डिसा रिंगणात आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे 61 नगरसेवकांचं संख्याबळ आहे. शिवसेनकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहे. बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड आहे.

महापौरपदावरुन भाजपमध्ये गटबाजी असल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन या दोघांच्या गटात रस्सीखेच होती. मेहता गटाचा भाजप उमेदवार ज्योती हसनाळेंना पाठिंबा आहे. परंतु भाजपमधील 14 नगरसेवक गीता जैन यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं. महापौर निवडणुकीत चमत्कार घडवणार, असा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

मीरा भाईंदर महापालिकेत मेहता समर्थक ज्योती हसनाळे भाजपच्या महापौर होणार हे निश्चित आहे. परंतु गीता जैन, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले, तर शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Mira Bhaindar Corporator on Stretcher

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.