Mizoram Election Result 2023 : मिझोरममध्ये सत्तांतराची चिन्हे; कोणता पक्ष आघाडीवर?

Mizoram Election Result Update 2023 : आज सकाळपासून सुरु असलेली मतमोजणी पाहता मिझोरममध्ये सत्तांतराची चिन्हे दिसत आहेत. धक्कादायक निकाल मिझोरममध्ये लागताना दिसतो आहे. अशातच मिझोरममध्ये आता यंदा कुणाची सत्ता येणार याची चर्चा होतेय. मतमोजणीत कोणता पक्ष आघाडीवर? पाहा...

Mizoram Election Result 2023 : मिझोरममध्ये सत्तांतराची चिन्हे; कोणता पक्ष आघाडीवर?
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 10:36 AM

आयजोल | 04 डिसेंबर 2023 : मिझोरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती यायला सुरुवात झाली आहे. ZPM पक्ष 20 जागांवर पुढे आहे. तर सत्ताधारी असणारा MNF पक्ष मात्र 13 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही प्रादेशिक पक्ष या निवडणुकीत आघाडीवर आहेत. अशातच काँग्रेस पाच विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. तर भाजप केवळ एका जागेवर पुढे आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या या मतमोजणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.

मिझोरमची विधानसभा निवडणूक

मिझोरममध्ये 40 जागांसाठी निवडणूक होत आहे. इथं 7 नोव्हेंबर मतदान झालं. आता आज तिथं मतमोजणी होणार आहे. जोरमथांगा हे मिझोरमचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. जोरमथांगा यांच्या नेतृत्नातील नॅशनल फ्रंट (एमएनएफ) जोरम पीपल्स मूवमेंट (जेडीएम)आणि काँग्रेस यांच्या इथं त्रिकोणी लढत होत आहे. मिझोरममध्ये भाजपचं तितकंस वर्चस्व दिसत नाहीये. त्याचंच चित्र सध्या समोर येत असलेल्या निकालात दिसत आहे.

मिझोरममधील लढाई

भाजप आणि काँग्रेस हे जरी राष्ट्रीय पक्ष असले तरी मिझोरममध्ये मात्र त्यांची तितकीशी पकड नाहीये. याआधी भाजप 39 जागांवर निवडणूक लढवत होते. मात्र यंदा त्यांनी केवळ 23 जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. तर आम आदमी पक्ष मिझोरममध्ये पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत. आपने चार ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. 27 ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर एमएनएफ आणि काँग्रेसमध्येतर थेट लढत होत आहे.

कोण जिंकणार?

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यात मागच्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर काल 3 डिसेंबरला मतमोजणी झाली. मात्र मिझोरममध्ये काल ऐवजी आज मतमोजणी होत आहे. मिझोराममधील जनता आणि राजकीय पक्षांनी 4 डिसेंबरला मतमोजणी घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज इथं मतमोजणी होत आहे. कालच्या निकालात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपला बहुमत मिळालं. तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस विजयी झाला. आता आज मिझोरममध्ये काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं असेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.