‘मातोश्री’वर या दोन इच्छुकांच्या संयमाची कसोटी

शिवसेना उमदेवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यावर्षी मातोश्रीवर अधिकृत उमेदवारांना पक्षाच्या एबी फॉर्मचे वितरण (Shivsena AB Form Distribution) करत आहे.

'मातोश्री'वर या दोन इच्छुकांच्या संयमाची कसोटी
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 6:42 PM

मुंबई: शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) उमेदवारांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. मात्र, उमदेवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यावर्षी मातोश्रीवर अधिकृत उमेदवारांना पक्षाच्या एबी फॉर्मचे वितरण (Shivsena AB Form Distribution) केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुक मातोश्रीवर (Shivsena Matoshri) येऊन आपले एबी फॉर्म शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) स्वीकारत आहेत. मात्र, भांडूप पश्चिम मतदारसंघात (Bhandup West Constituency) कुणाला उमेदवारी मिळणार याचा पेच अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

भांडूप मतदारसंघातून आपल्यालाच एबी फॉर्म मिळावा म्हणून इच्छुक असलेले विद्यमान आमदार अशोक पाटील (MLA Ashok Patil) आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर (Ramesh Koregaonkar) मातोश्रीवर तळ ठोकून आहेत. ते आपल्या उमेदवारीसाठी एबी फॉर्मची वाट पाहात (Waiting for AB form) मातोश्रीत थांबलेले आहेत. मात्र, अनेक उमेदवारांना आपला एबी फॉर्म मिळत असताना त्यांना वाटच पाहण्याची वेळ आली आहे.

मागील 3 दिवसांपासून आमदार अशोक पाटील आणि रमेश कोरगावकर मातोश्रीवर थांबून आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर कोणताही निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी भांडुप पश्चिम मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय प्रलंबित ठेवल्याचंच सध्या चित्र आहे. असं असलं तरी दोन्ही इच्छुकांनी हार मानलेली नाही. एबी फॉर्म मिळावा म्हणून दोघेही अगदी संयमाने ‘मातोश्री’वर तळ ठोकून आहेत. त्यामुळे ‘मातोश्री’ या दोघांच्या संयमाची कसोटी पाहातेय की काय असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

आजूबाजूला अनेक खुर्च्यांमध्ये बसलेले इच्छुक ‘मनातील खुर्ची’च्या प्रतिक्षेत

मातोश्रीवर इच्छुकांच्या बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक उमेदवार येथे येऊन आपले एबी फॉर्म घेऊन गेले आहेत. मात्र, पाटील आणि कोरगावकर यांचा नंबर न लागल्याने ते सध्या रिकाम्या खुर्च्यांच्या गराड्यात बसलेले पाहायला मिळत आहेत. या दोघांच्या आजूबाजूला अक्षरशः खुर्च्याच खुर्च्या आहेत. मात्र, हे दोघेही निवडणुकीतील विजयासह येणाऱ्या सत्तेच्या खास ‘खुर्ची’साठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. दोघेही आपल्याला उद्धव ठाकरे एबी फॉर्म देणार या आशेवर वाट पाहत आहेत. मात्र, अंतिमतः एकाच्या हाती निराशाच येणार असल्याचंही स्पष्ट आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.