शिंदे गटात सामील झालेले आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
मुंबई : आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू(MLA Bachu Kadu) यांच्याविरोधात राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्ररकरणी कार्टाने बच्चू कडू यांना जबरदस्त झटका दिला आहे.
2018 मधील हे प्रकरण आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल झाल होता. बच्चू यांनी त्यानुसार बच्चू कडू हे गिरगाव कोर्टात हजर झाले. त्यांचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.
बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान बच्चू कडू पुन्हा जामिनासाठी अर्ज करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातील अपक्ष आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर बच्चू कडू हे शिंदे गटात सामील झाले.