Chandrashekhar Bawankule : तेव्हा मुख्यमंत्री भेटले नाहीत अन् उपमुख्यंत्र्यांनी झोपा काढल्या..! मविआचा कारभार बावनकुळेंनी एका वाक्यात मांडला
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याअनुंशाने आता नुकसानीचा आढावा सरकारकडे दिला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विरोधकांकडून बाऊ केला जात असला तरी महाविकास आघाडी सरकारने एवढी नुकसान भरपाई दिली नाही त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई हे सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. मदतीबरोबरच ती योग्य व्यक्तीला मिळणेही तेवढेच गरजेचे आहे.
ठाणे : आता (Maharashtra Politics) राज्यात शिंदे आणि फडवणवीस यांचे सरकार असले तरी भाजपाचे नेते (MVA) महाविकास आघाडीवर टीका टिपण्णी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आतापर्यंत उध्दव ठाकरे हे कुणाला भेटत नव्हते असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार हे दिवस उजाडताच कामाला सुरवात करातात याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील अनेक नेत्यांनी दिली आहे. असे असताना (Chandrashekhar Bawankule) आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सडकून टिका केली आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे कुणाला भेटले नाहीत तर अजित पवार यांनी केवळ झोपा काढल्या असा आरोप त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस प्रत्येक काम करेल आणि जनतेला न्याय देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर जे अडीच वर्षात झाले नाही ते आताच्या सरकारच्या काळात विकास कामे होतील असेही त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याअनुंशाने आता नुकसानीचा आढावा सरकारकडे दिला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विरोधकांकडून बाऊ केला जात असला तरी महाविकास आघाडी सरकारने एवढी नुकसान भरपाई दिली नाही त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई हे सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. मदतीबरोबरच ती योग्य व्यक्तीला मिळणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे वेळ लागला तरी योग्य व्यक्ती आणि योग्य ती रक्कम मिळणे गरजेचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.
शिंदे सरकारचे 36 दिवसांमध्ये 42 निर्णय
शिंदे सरकारची स्थापना होऊन केवळ 36 दिवस झाले आहेत. या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 42 निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन पक्षामुळे विकासात्मक निर्णयात सातत्याने खोडा घातला जात होता. आता हे सरकार निर्णय घेण्यास मोकळे असून प्रत्येक काम करेल आणि जनतेला न्याय देईल असे आहे. शिवाय मागच्या सरकारच्या तुलनेत 4 पटीने अधिक कामेही होतील. सरकारच्या कामाची पध्दत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अनुभवत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
अजित पवारांचे लक्ष बारामतीवरच
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यांना त्वरीत मदत मिळावी अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे. त्यांना आता शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत आहेत पण सत्तेत होते त्यावेळी केवळ बारामतीच्या विकासावर त्यांचे लक्ष होते. विकास कामातील दुजाभाव आता सर्वसामान्यांपासून लपून राहणारा नसल्याचेही बावनकुळे म्हणाले आहेत. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मंत्रमंडळाच्या विस्ताराच्या अनुशंगाने दिल्लीला गेले नाहीत तर नीती आयोगाच्या भेटीसाठी गेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.