Maharashtra Politics : बच्चू कडूंचं गोड हसू आणि शंभुराजे देसाईंचा जय महाराष्ट्र! बंडखोर कॅमेऱ्यासमोर येताच कसे वागले? पाहा

एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी प्रथमच माध्यमासमोर येत प्रतिक्रिया दिली. मात्र अनेक बंडखोर आमदारांनी मीडियासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

Maharashtra Politics : बच्चू कडूंचं गोड हसू आणि शंभुराजे देसाईंचा जय महाराष्ट्र! बंडखोर कॅमेऱ्यासमोर येताच कसे वागले? पाहा
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 8:37 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (sivsena) बंडखोरी केली आहे. ते विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून नॉटरिचेबल होते. त्यानंतर मंगळवारी दिवसभर त्यांचा मुक्काम सुरतमधील एका हॉटेलमध्ये होता. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे आसामला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून, महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) कोसळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकट्या शिवसेनेचेच नाही तर बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार संघटनेचा एक आमदार देखील आहे. जेव्हा हे बंडखोर आमदार प्रसारमाध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी बोलणे टाळले आहेत. पाहुयात नेमंक कोण काय म्हटलं.

एकनाथ शिंदे आज राज्यपालांना भेटणार

मला तब्बल 40  आमदारांचा पाठिंबा असून, माझ्याकडे आहे तीच खरी शिवसेना आहे. असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच आज एकनाथ शिंदे विशेष विमानाने मुंबईत दाखल होऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे बोलत असताना कॅमेऱ्यात बच्चू कडू देखील स्पॉट झाले आहेत. बच्चू कडू या व्हिडीओमध्ये हसताना दिसत आहेत. त्यांच हसू हेच सर्व काही सांगून जात आहे.

हे सुद्धा वाचा

कॅमेऱ्यासमोर येताच आमदाराने चेहरा झाकला

याच घडामोडीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कॅमेऱ्यासमोर येताच एक बंडखोर आमदार आपला चेहरा झाकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

बिर्यानी खाने जा रहे है – सत्तार

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार देखील या बंडखोर आमदारांसोबत आहेत. त्यांचा देखील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पत्रकार त्यांना काही प्रश्न विचारत आहेत. मात्र आपल्याला बिर्याणी खाण्यासाठी जायचे असल्याचे या व्हिडीओमध्ये सत्तार यांनी म्हटले आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपाल महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करायला लावण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.