रामराजे नाईक निंबाळकर भाजपबरोबर जातील का? आमदार महेश शिंदेंच्या उत्तराने चर्चेला राजकीय वर्तुळात खळबळ

विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याही भाजप प्रवेशाबाबत जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आमदार महेश शिंदे यांना विचारलं असता आता खळं उठलंय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही, असं वक्तव्य केल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

रामराजे नाईक निंबाळकर भाजपबरोबर जातील का? आमदार महेश शिंदेंच्या उत्तराने चर्चेला राजकीय वर्तुळात खळबळ
आमदार महेश शिंदे, रामराजे नाईक निंबाळकर
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 9:57 PM

सातारा : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि आता राज्यात शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार आलं आहे. या सत्तांतरानंतर आता पक्षांतरालाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण भाजपनं आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केल्याचं दिसंतय. माढ्याचे आमदार बनन शिंदे (Baban Shinde) आणि मोहोळचे माजी आमदार राजीन पाटील यांनी आज दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महत्वाची बाब म्हणजे विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याही भाजप प्रवेशाबाबत जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आमदार महेश शिंदे यांना विचारलं असता आता खळं उठलंय, वस्ती उठायला जास्त वेळ लागणार नाही, असं वक्तव्य केल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

रामराजे नाईक निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याबाबत शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांना माध्यमांनी विचारलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्यून कुणी शिंदे गट किंवा भाजपसोबत जाईल असं वाटतं का? असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, आमच्याकडे सध्या मोठी लाईन आहे. त्यामुळे सब कतार में है. मुख्यमंत्री म्हणजे ठाण्याची दाढी आहे. योग्य टायमिंग साधत ते कार्यक्रम करतात. त्यामुळे ज्यांना दादागिरीपासून मुक्तता हवी आहे, ज्यांना खरोखर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, अशा सगळ्यांना मुख्यमंत्री सोबत घेतील, असं शिंदे म्हणाले. शिंदे यांनी एकप्रकारे नाव न घेता अजित पवारांवर टीका केलीय.

दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरु

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर आहेत. या दरम्यानच्या काळातच महाराष्ट्र सदनामध्ये राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठीता सिलसिला सुरु झाला आहे. शपथविधी सोहळा पार पडताच जालन्याचे अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. असे असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदार संघाचे आ. बबनदादा शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन राष्ट्रवादीचे नेते आता भाजपात प्रवेश करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार म्हणतात कामासाठी भेट

आमदार बबनदादा शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजितदादा म्हणाले की, बबनदादा शिंदे यांचा फोन आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आला होता. त्यांचे दिल्लीतही कारखाने आहेत. काही कामानिमित्त त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. मी उपमुख्यमंत्री असताना भाजपचेही अनेक आमदार मला भेटण्यासाठी येत होते किंवा आम्हीही त्यांच्या भेटीगाठी घेतो, तेव्हा तुम्ही आम्हालाही असच म्हणाल का? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.