VIDEO : नितेश राणेंकडून उपअभियंत्याला पूलाला बांधून चिखलाची अंघोळ
मुंबई गोवा महामार्गावरून आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
सिंधुदुर्ग : गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली. आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे सातत्याने अपघात होतात. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र त्या तक्रारांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, नितेश राणे यांनी थेट उपअभियंत्यावर हल्लाबोल केला.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नितेश राणे आक्रमक, उपअभियंत्याला कमरेला बांधून पुलाला बांधलं, चिखलाची आंघोळ @NiteshNRane pic.twitter.com/VGSrDvSbzH
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019