बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात स्फोटक मुलाखत

MLA Nitin Deshmukh And MLA Kailas Patil on CM Eknath Shinde Rebellion : उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले अन् 6 महिन्यातच सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या; त्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडातील धागेदोरे सांगितले...

बंडाच्या एक महिनाआधीच शिंदे मुख्यमंत्री होणार हे फिक्स होतं; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात स्फोटक मुलाखत
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 8:41 AM

मुंबई : 2019 ला मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटली अन् शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. पुढे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अन् उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ठाकरे सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पण गेल्या वर्षी तेव्हा नगरविकासमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत युती केली. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान नक्की काय घडलं? आमदार सूरतला कसे गेले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कधी ठरलं? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले. त्याची उत्तरं देणारी एक मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे.

अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी अकोला-बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत.

सत्तांतर होण्याच्या एक महिनाआधी आम्हाला हे माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित हे माहिती नसावं. पण स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की, मी मुख्यमंत्री होणार आहे, असं गौप्यस्फोट नितीन देशमुख केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय सांगतात माध्यमांसमोर की मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. पण फडणवीसांना सत्तांतर होणार हे माहिती होतं. पण मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नव्हतं. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना फक्त माहिती होतं की मुख्यमंत्री होणार ते, असा खुलासा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सहा महिन्यातच सत्ता बदल करण्याच्या आणि बंडखोरीच्या तयारीला सुरूवात झाली, असं नितीन देशमुख म्हणालेत.

आमदार कैलास पाटील यांनीही मोठे खुलासे केलेत. त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्यावर भेटत नाहीत. ते लोकांना वेळ देत नाहीत, असे आरोप करणं चूक आहे. कारण आम्ही पहिल्यांदा आमदार झालेलो असताना ते आम्हाला वेळ द्यायचे. आमच्याशी चर्चा करायचे मग मंत्र्यांनी तर आम्हाला वेळ दिली जात नाही, असं म्हणणं चूक आहे. कारण मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्याला व्हायची यात हे मंत्री उपस्थित असायचे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.