MLA Nitin Deshmukh: मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक हाव, एकनाथ शिंदेंच्या तावडीतून सुटलेल्या नितीन देशमुखांनी सांगितलेल्या 3 मोठ्या गोष्टी

काही काळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार नितीन देशमुख हे पुन्हा शिवसेनेकडे परतले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक गौप्यस्फोट केले. जाणून घेऊयात नेमकं नितीन देशमुख यांनी काय म्हटलं.

MLA Nitin Deshmukh: मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक हाव, एकनाथ शिंदेंच्या तावडीतून सुटलेल्या नितीन देशमुखांनी सांगितलेल्या 3 मोठ्या गोष्टी
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 2:34 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर काही काळ एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh)वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. नितीन देशमुख हे सुरतमध्ये बंडखोर आमदारांसोबत होते. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमी देखील समोर आली होती. मात्र आता खुद्द नितीन देशमुख यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येत मोठा खुलाला केला आहे. आपल्याा अटॅक वैगेरे काही आला नव्हता, मला बळजबरीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. माझा बीपी देखील नॉर्मल होता. मात्र तरी देखील मला अनेक इंजेक्श देण्यात आली, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

माझा घात करण्याचा प्लान

यावेळी बोतलतान  नितीन देशमुख म्हणाले की, मला कुठल्याही प्रकाराच अटॅक आला नव्हता. मात्र त्यांनी मला अटॅक आल्याचे भासवले. त्यानंतर मला बळजबरीने इंजेक्श देण्यात आले. त्यांचा माझ्या बॉडीवर काहीतरी प्रयोग करून माझा घात करण्याचा उद्देश होतो. मात्र मी देवाच्या कृपेने वाचलो असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मला हार्ट अटॅक आलाच नाही

मी आमच्या मंत्र्यांसोबत सुरतमध्ये फिरण्यासाठी गेलो होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. मी नॉर्मल असताना देखील मला हार्ट अटॅक आला आहे असे सगळीकडे सांगण्यात आले. मी पूर्ण ठणठणीत होतो. माझा बीपी देखील नॉर्मल होता. मात्र मला बळजबरीने  इंजेक्श देण्यात आल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.

मी शिवसैनिकच

नितीन देशमुख यांनी म्हटले आहे की, मी शिवसैनिकच आहे. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी कायम शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र नितीन देशमुख यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी देखील आमदारांवर दबाव टाकून त्यांचे आपहरण करून त्यांना बळजबरीने सुरतला नेण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मग आमदार सुरतवरून आसामला बळजबरी गेला का असा सवाल उपस्थित केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.