राष्ट्रवादीच्या काही जणांनी विरोधात काम केलं, काँग्रेस आमदाराचा आरोप

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सत्तास्थापनेच्या रणधुमाळीला नव्यानं सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीच्या काही जणांनी विरोधात काम केलं, काँग्रेस आमदाराचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 8:02 PM

वर्धा : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सत्तास्थापनेच्या रणधुमाळीला नव्यानं सुरुवात झाली आहे. दुसरीकडे निवडणूक काळात पक्षासाठी कोणी काम केलं आणि कोणी विरोधात भूमिका घेतल्या याबाबतही अनेक खुलासे (MLA Ranjit Kamble on rebellion candidate) होत आहेत. वर्ध्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी (MLA Ranjit Kamble on rebellion candidate) देखील असाच काहीसा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जणांनी आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेने जागा दाखवल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

रणजित कांबळे म्हणाले, “राष्ट्रवादीच्या खर्‍या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांनी आघाडीचं काम केलं नाही. मागेपुढे पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल.” या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांना जनता माफ करत नाही. अशा लोकांना जनता निवडणुकीत जागा दाखवते, असंही कांबळे यांनी नमूद केलं.

“पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेने जागा दाखवली”

आमदार रणजित कांबळे म्हणाले, “जे पक्षाशी प्रामाणिक राहिले नाही, त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. राज्यातील 23 उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना, भाजपमध्ये गेले. त्यातील 19 उमेदवार निवडणुकीत पडले. केवळ 4 जण निवडून आले. जनता असं पक्षांतर कधीही सहन करत नाही. या निकालातून जनतेने पक्ष सोडून गेलेल्यांना जागा दाखवली आहे.”

देवळी विधानसभा मतदारसंघातील लढत यावेळी लक्षवेधक होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार पाचव्यांदा रिंगणात होते. त्यांच्याविरोधात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले समीर देशमुख शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.