Navneet Rana : नवनीत राणा, रवी राणांच्या जामीन अर्जावर उद्या सेशन कोर्टात सुनावणी, बेल की जेलच? उद्या फैसला
आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. दोघेही सध्या जेलमध्ये आहेत. उद्या त्यांना बेल मिळणार की जेल मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सेशन कोर्टात (Mumbai Session Court) सुनावणी होणार आहे. दोघेही सध्या जेलमध्ये आहेत. उद्या त्यांना बेल मिळणार की जेल मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राणा यांच्याबाबत आजही कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यात कोर्टाने त्यांना एका गुन्ह्यात दिलासा दिला आहे. तर एका गुन्ह्यात त्यांना दणका देत गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढत चालल्या आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आणि शिवसेना भवनाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरण्यावरून वादात सापडले. त्यानंतर शिवसेना आणि त्यांच्याचला संघर्ष वाढत गेला. हा संघर्ष आता जेलवारीपर्यंत पोहोचला आहे. आता उद्या कोर्टात काय होतंय? यावर राणांचा उद्याचा मुक्काम कुठे असणार हे ठरणार आहे.
उद्या दिलासा मिळणार की जेलच?
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या मुंबई सेशन कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. उद्या याबाबत सुनावणी पार पडणार असल्याचेही म्हटले आहे. आजही कोर्टात राणा दाम्पत्याबाबत बराच वेळ युक्तीवाद झाला आहे. मात्र आज त्यांना दिलासा मिळाला नाही. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टातून बाहेर आल्यानंतर या युक्तीवादाबाबत माहिती दिली आहे.
Maharashtra | MLA Ravi Rana and MP Navneet Rana’s bail plea filed in Mumbai Session Court; matter to be heard tomorrow
— ANI (@ANI) April 25, 2022
नवनीत राणा यांची दिल्लीपर्यंत धाव
दरम्यान जेलमध्ये असणाऱ्या नवनीत राणा यांनी त्यांना न्याय मिळावा यासाठी दिल्लीपर्यंत धाव घेतली आहे. आपल्याला जेलमध्ये जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. योग्य वागणूक मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी पत्र लिहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी या तक्रारीची दखल घेत पुढच्या चोवीस तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र हा संघर्षही आणखी वाढण्याची शक्यता आहे.