मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या संपत्तीवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात येतेय. त्यावरून आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अनिल परबांवर टिकेचे बाण सोडलेत. त्यांनी कठोर शब्दात अनिल परबांवर शाब्दिक हल्ला चढवलाय. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे.वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहचवत होते.त्याचा आता या सगळ्याचा भांडाफोड होणार आहे. एस टी कर्मचाऱ्यांनी दिवाळी केली नाही त्यांची दिवाळी परबांमुळे अंधारात गेली. नवनीत राणा यांच्यासारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील”, असं रवी राणा म्हणाले आहेत.
रवी राणा यांनी कठोर शब्दात अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे.वाझेच्या माध्यमातून कलेक्शन जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहचवत होते.त्याचा आता या सगळ्याचा भांडाफोड होणार आहे”, असं अनिल परब म्हणाले आहेत.
“नवनीत राणा यांच्या सारख्या एका महिला खासदाराला अनिल परब यांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब आज गजाआड जाईल. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील”, असं रवी राणा म्हणाले आहेत.
अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. तसंच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं. याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती