शून्याचा शोध आर्यभट्टांचा, मात्र सर्वाधिक वापर भाजपकडून, रोहित पवारांचे टोले, सेल्फीच्या गराड्यात सव्वा तास अडकले
आपल्या पक्षासाठी जर कष्ट घेतले असतील तर त्याला न्याय मिळणं गरजेचे आहे," असेही रोहित पवार यावेळी (MLA Rohit Pawar criticizes BJP) म्हणाले.
बीड : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली (MLA Rohit Pawar criticizes BJP) होती. या बैठकीला कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी कार्यकर्ता बैठकीत रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. “शून्याचा शोध हा आर्यभट्टांनी केला आणि शून्याचा सर्वात जास्त वापर हा भाजपने केला आहे,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.
“काहीही अर्थ नाही शून्य ते शून्यचं. ना मुलांना काय पाहिजे, ना बायकांना काय पाहिजे, ना शेतकऱ्यांना किंवा कोणाला काय पाहिजे अशी परिस्थिती सध्या देशात आहे. मात्र राज्यात अशी परिस्थिती नाही,” असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
“भाजपची काही पिलावळ सतत आघाडी सरकार पडेल असे म्हणतात. आता पुढचे किमान 60 महिने तरी ते असचं करणार आहेत. महाविकासआघाडीचे हे सरकार शेवटपर्यंत टिकेल. हे सरकार पडणार नाही,” असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
“त्यामुळे जर ही लोकं आली, तर त्यांना सांगा पाच वर्षांनी बघू, आता तुझा टाईम संपला,” असेही रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
“येत्या काळात साधा कार्यकर्ता किंवा कोणताही पदाधिकारी असेल. त्याने आपल्या पक्षासाठी जर कष्ट घेतले असतील तर त्याला न्याय मिळणं गरजेचे आहे,” असेही रोहित पवार यावेळी (MLA Rohit Pawar criticizes BJP) म्हणाले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर रोहित पवार हे पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले होते. रोहित पवार बीडमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या आजूबाजूला सेल्फीसाठी गर्दी केली.
तब्बल सव्वा तास रोहित पवार हे सेल्फीच्या गराड्यात अडकून पडले. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर आणि पोलिसांनी मध्यस्थी करत रोहित पवारांची सेल्फीच्या गराड्यातून सुटका (MLA Rohit Pawar criticizes BJP) केली.