…तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती : संग्राम थोपटे

आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केल्यानंतर स्वतः संग्राम थोपटे काँग्रेस भवनाची पाहणी करण्यासाठी पोहचले (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack).

...तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती : संग्राम थोपटे
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 11:22 PM

पुणे : आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केल्यानंतर स्वतः संग्राम थोपटे काँग्रेस भवनाची पाहणी करण्यासाठी पोहचले (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack). त्यांनी काँग्रेस भवनातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस भवनाच्या इतिहासाची आठवण करुन दिली. 1999 मध्ये माझे वडील आनंदराव थोपटे यांनी काँग्रेस भवनाचा ताबा मिळवला नसता, तर काँग्रेस पक्षाला ही इमारत बसायलाही मिळाली नसती, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं (MLA Sangram Thopate on Congress Bhavan attack).

संग्राम थोपटे म्हणाले, “विरोधीपक्षातील लोकच येथे गोंधळ घालून आमच्यात वाद निर्माण करत असल्याचा मला संशय आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. कुणी हकालपट्टी करायची आणि काय बोलायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र स्थापना झाली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या इमारतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा 1999 मध्ये माझे वडिल आनंदराव थोपटे, देवीदास भंसाळी आणि श्रीरंग चव्हाण या जुन्या काँग्रेस नेत्यांनी या इमारतीचा ताबा मिळवला.”

माझ्या वडिलांपासून आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे. ताबा घेताना जे कुणी बोलत असतील ती मंडळी कोठे आहेत? ते मंडळी त्यावेळी पक्षात होती की नव्हते हाही प्रश्न आहे. निष्ठेच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आणि थोपटे कुटुंब हे पहिल्यापासूनचं ठरलेलं समीकरण आहे. त्याबद्दल जर कुणी हकालपट्टीची चर्चा करत असेल तर त्यांनाच याबद्दल विचारलं पाहिजे. 1999 मध्ये काँग्रेस भवनाचा ताबा घेतला नसता, तर काँग्रेसला ही इमारतच बसायला राहिली नसती. ती इमारत वाचवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं, असंही संग्राम थोपटे यांनी सांगितलं.

काँग्रेस भवनावर हल्ला करणारे माझे समर्थक नाही : संग्राम थोपटे

काँग्रेस भवनावर ज्यांनी हल्ला केला ते माझे समर्थक नव्हते, असा दावा संग्राम थोपटे यांनी केला आहे. ते म्हणाले, “जो प्रकार येथे घडला तो निंदनीयच आहे. आत्ता मी मुद्दाम पाहणी करण्यासाठी आलो. या ठिकाणी जे नुकसान झालं आहे याची मी माहिती घेतली आहे. असे प्रकार यापुढे होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. काँग्रेस भवनमध्ये काही काचा फुटलेल्या दिसत आहेत. खुर्च्या, टेबल, काचा असं प्राथमिक नुकसान झाल्याचं दिसत आहे. आता येथे साफसफाई करण्यात आली आहे. चॅनलवर जे काही व्हिडीओ पाहिले त्यातही टेबल, खुर्ची आणि काचा फोडल्याचं दिसत आहे. जो प्रकार घडला तो अगदी अचनाक अनपेक्षितपणे घडला.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.