Video : ‘मेंढपाळांना हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगडं तोडून परत येतील’, आमदार संजय गायकवाडांनी वनाधिकाऱ्यांना भरला दम

वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. इतकंच नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाणही करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या.

Video : 'मेंढपाळांना हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगडं तोडून परत येतील', आमदार संजय गायकवाडांनी वनाधिकाऱ्यांना भरला दम
आमदार संजय गायकवाडImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:10 PM

बुलडाणा : आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) नेहमीच आपल्या बिनधास्त आणि निर्भीड वक्तव्यांनी चर्चेच असतात. अनेकदा ते आपल्या वक्तव्यांमुळे वादातही अडकले आहेत. आजही त्यांनी असंच एक वक्तव्य केलंय. मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना (Forest Officers) भेट धमकीवजा इशारा दिलाय. मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी जमीन शिल्लक नाही. त्यामुळे वनविभागाने मेंढ्या चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector Office) आक्रोश मोर्चा काढला. यात शेकडो मेंढपाळ बांधव – भगिनी सहभागी झाले होते. दरम्यान वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. इतकंच नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाणही करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या.

‘..तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद’

मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला. आमच्या मेंढपाळाला जर हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगड तोडून परत येतील. वन अधिकाऱ्यांना जास्तच माज आला असेल तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद आहे. आणि अशा माजलेल्या सांडांची मस्ती उतरवण्याचे काम आपल्याला पुढच्या काळात करायचे आहे, अशा शब्दात संजय गायकवाड यांनी वन अधिकाऱ्यांना धमकीवजा इशारा दिलाय. मात्र, गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

‘फारसे आमदार नाराज आहेत असं वाटत नाही’

‘काही लोक मागून आले हे खरं जरी असलं तरी हा विस्तार धाला तो कॅबिनेट मंत्र्यांचा झालाय. फारसे आमदार नाराज आहेत असं मला वाटत नाही. आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली. त्यांना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागेल. महाविकास आघाडीच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती का? तशी मागणी त्यांनी केली होती का? हे आपल्याला माहिती नाही’, असं आमदार गायकवाड गुरुवारी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.