Shiv Sena : आमदार संजय राठोड गुरुवारी धामणगावात येणार, विकासकामांच्या लोकार्पणास हजेरी, शिवसैनिकांची भूमिका काय?

दोन दिवसांनंतर संजय राठोड धामणगाव देवी येथे कार्यक्रमासाठी येणार आहेत. अशावेळी स्थानिक शिवसैनिकांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळं त्यांनी संरक्षण दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक शिवसैनिकांनी संजय राठोड यांच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याला विरोध केला.

Shiv Sena : आमदार संजय राठोड गुरुवारी धामणगावात येणार, विकासकामांच्या लोकार्पणास हजेरी, शिवसैनिकांची भूमिका काय?
संजय राठोड
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 4:52 PM

यवतमाळ : सध्या गुवाहाटीत असलेले माजी मंत्री संजय राठोड हे 30 जून रोजी धामणगाव देव या ठिकाणी येणार आहेत. माऊली सागरसह विविध विकासकामांचे 30 जूनला लोकार्पण (Lokarpan) करण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजय राठोड यांची उपस्थिती राहीत. राठोड हे नागरिकांशी संवाद साधतील. परमहंस भगवान श्री मुंगसाजी महाराज (Mungsaji Maharaj) यांच्या अस्तित्वाने दारव्हा (Darvha) तालुक्यातील धामणगाव (देव) पावन झालेलं आहे. आमदार संजय राठोड हे गुरुवार ३० जून रोजी विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. आ. राठोड हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हापासून गुवाहाटीवरून थेट धामणगाव(देव) येथे पोहचणार असल्याचे त्याच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर ते सात दिवसांनंतर येणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वणीत शिवसैनिक आक्रमक

यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांचे गटात सामील झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. आज वणी येथे संतप्त शिवसैनिकांनी या बंडोखोर आमदारांचा निषेध मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा शिवाजी चौकात पोहचला. यावेळी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात वणी विभागातील असंख्य संतप्त शिवसैनिक सहभागी झाले. माजी आमदार विश्वास नंदेकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

शिवसैनिकांची भूमिका काय राहणार?

दोन दिवसांनंतर संजय राठोड धामणगाव देवी येथे कार्यक्रमासाठी येणार आहेत. अशावेळी स्थानिक शिवसैनिकांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळं त्यांनी संरक्षण दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक शिवसैनिकांनी संजय राठोड यांच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याला विरोध केला. तरीही दोन दिवसांत ते परत येणार असल्यानं शिवसैनिक कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.