उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी, संजय शिरसाट यांचा मोठा दावा, येत्या 8 ते 10 दिवसात शिवसेना…..
शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण करतील, हे सांगतानाच शिरसाट यांनी त्यामागील कारणही स्पष्ट केलं.
दत्ता कनवटे, औरंगाबादः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. येत्या ८ ते १० दिवसात ठाकरेंची शिवसेना (Shivsena) पूर्णपणे रिकामी होणार, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी टीव्ही9 शी बोलताना हा मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण करतील, हे सांगतानाच शिरसाट यांनी त्यामागील कारणही स्पष्ट केलं.
शिवसेनेत जो सकाळजा भोंगा सुरू आहे, त्यामुळे शिवसेना रिकामी होणार आहे, हे वक्तव्य करताना संजय शिरसाट यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाही तर आगामी निवडणूक लढवायची की नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहिल, असं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलंय.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेला काल मोठं खिंडार पडलं. मोठ्या संख्येने नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेची ही अवस्था सावरण्यासाठी संजय राऊतांना तातडीने नाशिकला जावं लागलं. हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संजय राऊत कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
शिरसाट यांचा दुसरा दावा कोणता?
संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत बोलताना आणखी एक दावा केला. येत्या २० ते २२ जानेवारीपर्यंत शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तारातील तांत्रिक अडचणी दूर होतील, त्यामुळे सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागणार, असं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.
मंत्रिमंडळ विस्तार व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रक्रियेतील तांत्रिक अडचण लवकरच दूर होईल, आणि पुढील काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आश्वासन दिल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं.